अयाना, लेगेसेने जिंकली ‘दिल्ली’, भारतीय गटात नीतेंद्र सिंग, सुरिया विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:49 AM2017-11-20T03:49:27+5:302017-11-20T03:49:35+5:30
नवी दिल्ली : इथिओपियाच्या अलमाज अयाना हिने प्रथमच दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
नवी दिल्ली : इथिओपियाच्या अलमाज अयाना हिने प्रथमच दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत महिला गटाचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटात इथिओपियाच्याच बेरहानू लेगेसेने बाजी मारली. भारतीय गटात नीतेंद्र सिंग व एल. सुरिया यांनी सुवर्णपदक पटकावले. दिल्लीतील वायूप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांनी मोठ्या संख्येने हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
महिला गटात दहा हजार मिटर स्पर्धेत जागतिक विक्रम नावावर असलेली आॅलिम्पिकविजेती अयानाने ही स्पर्धा १ तास ७ मिनिटे व ११ सेकंदात पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला.
पुरुष गटात लेगेसेने ५९ मि. ४६ से. ही स्पर्धा पूर्ण करत जेतेपद पटकावले. अनाडामलाक बेलिहूने (इथिओपिया) ५९ मिनिटे ५१ सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. अमेरिकेच्या लियोनार्ड कोरिर ५९ मि. ५२ सेकंदात स्पर्धा पूर्ण करत तिसरा आला. आॅलिम्पिकपटू नीतेंद्र सिंग रावतने १ तास ३ मि. ५३ से. वेळ नोंदवत भारतीय गटात विजेतेपद पटकावले. दुसºया क्रमांकावरील लक्ष्मणनेही हीच वेळ नोंदवली, मात्र फोटोफिनिश तंत्रज्ञानाद्वारे तो दुसºया क्रमांकावर राहिला. महाराष्टÑाच्या अविनाश साबळेने पदार्पणातच तिसरा क्रमांक पटकावले.
भारतीय महिला गटात एल. सुरियाने नवा स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. सुरियाने १ तास १० मिनिटे ३१ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. दुसºया क्रमांकावर सुधा सिंग (१ तास ११ मिनिटे ३० सेकंद) तर तिसरा क्रमांक पारुल चौधरीने (१ तास १३ मिनिटे ९ सेकंद) पटकावला.
>नीतेंद्रसिंगची अॅथलिट संघटनेवर टीका
भारतीय गटातील विजेता नीतेंद्रसिंंग रावत याने राष्टÑीय शिबिरात आपल्याला स्थान न दिल्याबद्दल टीका केली. त्याची कामगिरी चांगली नाही, असे कारण देत पुढील वर्षी होणाºया राष्टÑकुल व आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठीच्या राष्टÑीय शिबिरात नीतेंद्रसिंगचा समावेश करण्यात आला नाही. नीतेंद्र सिंग म्हणाला, की मी येथे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आलो होतो. राष्टÑीय शिबिरासाठी माझ्या नावाचा विचार झाला नाही. मी राणीखेत येथे माझ्या अकादमीत सराव करत आहे.