अजहरने पाकला सावरले; ८५ धावांची नाबाद खेळी
By admin | Published: June 29, 2015 01:16 AM2015-06-29T01:16:57+5:302015-06-29T01:16:57+5:30
अजहर अलीच्या नाबाद ८५ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या आशा कायम राहिल्या आहेत. सुरुवातीला सामन्यावर श्रीलंकेचे वर्चस्व दिसून आले.
कोलंबो : अजहर अलीच्या नाबाद ८५ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या आशा कायम राहिल्या आहेत. सुरुवातीला सामन्यावर श्रीलंकेचे वर्चस्व दिसून आले. पहिल्या डावात १७७ धावांनी पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने सकाळच्या सत्रात दोन फलंदाज गमावले. त्यानंतर मात्र अजहर अली एक बाजू सांभाळत उपहारापर्यंत ४ बाद २४४ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानने ६७ धावांची आघाडी मिळवली असून त्याचे सहा फलंदाज शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूने असद शफिक १० धावांवर खेळत आहे.
त्याआधी, पाकिस्तानने रविवारी २ बाद १७१ धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. अजहरने शनिवारच्या ६४ धावांत ४ धावा जोडल्या तेव्हा त्याला जीवदान मिळाले. कुमार संगकाराने हा झेल सोडला. त्यानंतर युनिस खान अॅन्जेलो मॅथ्यूजच्या चेंडूवर दिनेश चंडीमलकरवी झेल बाद झाला. कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या युनिसने पहिल्या डावात ६, तर दुसऱ्या डावात ४०
धावा केल्या. त्यानंतर कर्णधार मिसबाह-उल-हक २२ धावांवर पायचित झाला. (वृत्तसंस्था)