अक्रम, आफ्रिदीकडून अजहरची पाठराखण

By admin | Published: September 11, 2016 08:44 PM2016-09-11T20:44:25+5:302016-09-11T20:44:25+5:30

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांनी टीकाकारांचे लक्ष्य बनणारा वनडे संघाचा कर्णधार अजहर अली याची पाठराखण करताना

Azhar's clutches from Akram, Afridi | अक्रम, आफ्रिदीकडून अजहरची पाठराखण

अक्रम, आफ्रिदीकडून अजहरची पाठराखण

Next

ऑनलाइन लोकमत
कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांनी टीकाकारांचे लक्ष्य बनणारा वनडे संघाचा कर्णधार अजहर अली याची पाठराखण करताना त्याला यूएईमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत आणखी एक संधी देण्याचा आग्रह केला आहे.

स्विंगचा बादशाह अक्रम म्हणाला, ह्य२0-२२ सामन्यात नेतृत्व केल्यानंतरच कर्णधार म्हणून अजहरचे आकलन करायला हवे. कोणत्याही कर्णधाराबाबत निर्णय घेण्याआधी त्याला कमीत कमी ३0 ते ३५ सामन्यांत कर्णधारपद सांभाळण्याची संधी मिळायला हवी, असे माझे वैयक्तिक मत आहे. अजहर वनडेत एक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करीत आहे आणि त्याच्यासाठी आता मुख्य आव्हान हे संघाला एकरूप करणे हे आहे आणि यासाठी त्याला जास्त वेळ द्यायला हवा.ह्ण दुसरीकडे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनेदेखील अजहरला वनडे संघाचा कर्णधार कायम ठेवण्याचे समर्थन केले.

आफ्रिदी म्हणाला, आम्हाला घाईत कोणताही निर्णय घ्यायला नको. अजहर वनडेत खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी करीत आहे आणि त्याला वेळ द्यायला हवा. सर्फराज अहमददेखील आता चांगली कामगिरी करीत आहे; परंतु त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकल्याने त्याच्यावर खूप दबाव वाढेल. अजहरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला इंग्लंड दौऱ्यात वनडे मालिकेत १-४ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता.

 

Web Title: Azhar's clutches from Akram, Afridi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.