बी. साई प्रणीतचा विजय

By admin | Published: March 11, 2016 03:39 AM2016-03-11T03:39:23+5:302016-03-11T03:39:23+5:30

युवा खेळाडू बी. साई प्रणीत याने आपल्या कारकिर्दीमधील सर्वांत सनसनाटी निकाल नोंदवताना प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मलेशियाच्या जागतिक क्रमवारीतील

B Sai Praneeth Vijay | बी. साई प्रणीतचा विजय

बी. साई प्रणीतचा विजय

Next

बर्मिंगहॅम : युवा खेळाडू बी. साई प्रणीत याने आपल्या कारकिर्दीमधील सर्वांत सनसनाटी निकाल नोंदवताना प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मलेशियाच्या जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू ली चोंग वेईला धक्का दिला.
दोन वेळा आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या चोंग वेईला प्रणीतने ५० मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात २४-२२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवून खळबळ माजवली. स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या चोंग वेईने तब्बल ३ वेळा ही स्पर्धा जिंकली असून, या वेळीदेखील त्याची गणना प्रबळ विजेत्यांमध्ये होती. मात्र, प्रणीतने अनपेक्षित विजय मिळवताना सर्व चित्रंच बदलले. चुरशीच्या झालेल्या पहिल्या सेटमध्ये अंतिम क्षणी खेळ उंचावून निर्णायक आघाडी घेतलेल्या प्रणीतला दुसऱ्या सेटमध्येही कसलेल्या चोंग वेईकडून कडवी झुंज मिळाली. या वेळी प्रणीतने काही उत्कृष्ट स्मॅश मारताना नेटजवळ वेगवान खेळ करून चोंग वेईला दडपणाखाली ठेवले.पुढील फेरीत प्रणीतचा
सामना जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या हैन्स क्रिस्टीन विटींगस (डेन्मार्क)
विरुद्ध होईल.
याआधी २०१३मध्ये
फ्रेंच ओपनमध्ये हैन्सविरुद्ध पराभूत झाल्याने प्रणीतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
आले होते.
त्यामुळे प्रणीतवर या सामन्यत काहीसे दडपण असेल. मात्र चोंग वेईविरुद्ध प्रणीतने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे हैन्सला गाफील राहणे महागात पडू शकते.प्रणीतने एका बाजूला शानदार विजय नोंदवल्यानंतर दुसऱ्या बाजूला ‘फुलराणी’ सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंसह समीर वर्मानेही विजयी सलामी दिली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सायनाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. सायनाने दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बुसान ओंगबुमरंगफानचा २१-१६, २१-९ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला़ तत्पूर्वी तिने कॅनडाची राष्ट्रकुलविजेती मिशेल ली हिला २१-१७, २१-१२ असे लोळवले.

Web Title: B Sai Praneeth Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.