राजीव गांधी यांच्या नावानं 'खेलरत्न' पुरस्कार नको; बबिता फोगाटची मागणी, पण केली मोठी चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:57 PM2020-09-02T19:57:23+5:302020-09-02T19:59:44+5:30
राजीव गांधी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आक्षेप नोंदवला होता.
भारतीय जनता पार्टीची सदस्य झाल्यापासून कुस्तीपटूबबिता फोगाट सातत्यानं सोशल मीडियावरून काँग्रेस अन् विरोधी पक्षांवर टीका करत आली आहे. आता देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारावरून तिनं पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं असून तिनं राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.
IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगानं घेतली माघार
29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि 13 जणांना द्राणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात आलं. कोरोना व्हायरसमुळे हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केलं.
बाबो; लिओनेल मेस्सीला इंग्लंडच्या टॉप क्लबकडून 6,070 कोटींची तगडी ऑफर!
त्या दिवशीही बबितानं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आक्षेप नोंदवला होता. तिनं लिहिलं होतं की,''राजीव गांधी यांनी भारतात उभं राहून इटलीत भाला फेल केली म्हणून त्यांच्या नावानं खेल रत्न पुरस्कार दिला जातो का?''
क्या राजीव गांधी के नाम से इसलिए खेल रत्न पुरस्कार दिया जाता है कि उन्होंने एक बार भारत से खड़े-खड़े इटली में भाला फेंक दिया था।
— Babita Phogat (@BabitaPhogat) August 29, 2020
आज तिनं पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. तिनं ट्विट केलं की,''क्रीडा पुरस्कार हे राजकारण्यांच्या नावानं नव्हे तर महान खेळाडूंच्या नावानं दिली गेली पाहिजेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानचं नाव बदलून कोणत्यातरी खेळाडूच्या नावानं द्यायला हवं, माझा हा प्रस्ताव तुम्हाला कसा वाटला?''
खेलों से सम्बंधित पुरस्कार सिर्फ़ महान व सम्मानित खिलाड़ियों के नाम पर ही होना चाहिए ना कि किसी ‘राजनैतिक व्यक्ति’ के।
— Babita Phogat (@BabitaPhogat) September 2, 2020
‘राजीव गांधी रत्नखेल ’ पुरस्कार का नाम बदलकर किसी खिलाड़ी के नाम पर किए जाने का सुझाव आपको कैसा लगा।
#खेलरत्न_खिलाड़ी_के_नाम_पर
ही मागणी करणाऱ्या बबितानं 'खेल रत्न' पुरस्काराचं नाव 'रत्नखेल' असं लिहिल्यानं तिला ट्रोल केलं जात आहे.
वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया
महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं
मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी
CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली
टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी
बबिता फोगाटची कामगिरी
बबितानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.