बॅडमिंटन : भारत उपांत्य फेरीत
By admin | Published: July 28, 2014 03:43 AM2014-07-28T03:43:59+5:302014-07-28T03:43:59+5:30
स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतरही भारताने कॅनडावर ३-१ने मात करीत २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र सांघिक बॅडमिंटन क्रीडाप्रकारात उपांत्य फेरी गाठली
स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतरही भारताने कॅनडावर ३-१ने मात करीत २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र सांघिक बॅडमिंटन क्रीडाप्रकारात उपांत्य फेरी गाठली. के. श्रीकांत व ज्वाला गुट्टा यांनी टॉबी एनजी व अॅलेक्स ब्रुस यांचा २१-१९, १७-२१, २१-१८ ने पराभव करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पी. कश्यपने अॅण्ड्य्रू डिसूझाचा २१-११, २१-९ ने पराभव करीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पी. व्ही. सिंधू हिला मात्र हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या मिशेल लीविरुद्ध २१-१५, २०-२२, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्रणव चोपडा व अक्षय देवाळकर जोडीने अॅड्रियन लियू व डेरिक एनजी या जोडीचा २१-१५, १९-२१, २१-१३ने पराभव करीत भारताला ३-१ ने विजय मिळवून देत उपांत्य फेरी गाठून दिली.