बद्रीची "दुल्हनिया" मुंबईने पळवली, विजयाची हॅटट्रीक

By Admin | Published: April 14, 2017 07:36 PM2017-04-14T19:36:57+5:302017-04-14T21:17:44+5:30

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला.

Badri "Dulhania" caught by Mumbai, hat-trick of victory | बद्रीची "दुल्हनिया" मुंबईने पळवली, विजयाची हॅटट्रीक

बद्रीची "दुल्हनिया" मुंबईने पळवली, विजयाची हॅटट्रीक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला. यासोबतच मुंबईने आयपीएलमधील सलग तिस-या विजयाची नोंद केली. बंगळुरुने दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात अत्यंत दयनिय झाली. केवळ 7 धावांवरच मुंबईचे 4 खेळाडू बाद झाले होते. यंदाच्या आयपीएलमधला पहिलाच सामना खेळणारा फिरकी गोलंदाज सॅम्यूअल ब्रद्रीने घातक गोलंदाजी करत या आयपीएलमधील पहिल्या हॅटट्रीकची किमया केली. बद्रीने तिसऱ्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर पार्थिव पटेल (3) त्यानंतर मॅग्लेघन (0) आणि कर्णधार रोहित शर्मा (0) यांना माघारी धाडून मुंबईला जोरदार हादरे दिले. पण त्यानंतर मैदानात आलेल्या केरॉन पोलार्डला(47 चेंडू 70 धावा) या सामन्यात सूर गवसला. त्याने फटकावलेल्या अर्धशतकाने बद्रीच्या कामगिरीवर पाणी फिरवलं. पोलार्डला युजवेंद्र चहलने डिव्हिलिअर्सकरवी झेल बाद केलं तोपर्यंत मुंबईच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. या खेळीत पोलार्डने 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले. त्याला क्रुणाल पांड्याने चांगली साथ दिली, पांड्याने नाबाद 37 धावा केल्या.   
यापुर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. दुखापतीनंतर मैदानात आयपीएलची पहिलीच मॅच खेळणा-या विराट कोहलीने साऊदीच्या एकाच ओव्हरमध्ये जबरदस्त सिक्सर आणि दोन फोर मारत आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली. विराट कोहलीसोबत ख्रिस गेलही फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता मात्र, हार्दिक पांड्याने ख्रिस गेलला आऊट केले. ख्रिस गेलने 27 बॉल्समध्ये केवळ 22 रन्स केले. यामध्ये दोन फोर आणि एका सिक्सरचा समावेश आहे.
विराट कोहलीने 47 बॉल्समध्ये 62 रन्सची खेळी खेळली ज्यामध्ये 5 फोर आणि 2 सिक्सरचा समावेश आहे. एबी डेव्हिलियर्सने 21 बॉल्समध्ये 19 रन्स केले. केदार जाधवने 8 बॉल्समध्ये 9 रन्स केले. तर नेगीने 13 बॉल्समध्ये 13 रन्स केले.
मुंबई इंडियन्सकडून मॅक्लेनघनने दोन विकेट्स घेतले. तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेच घेतले. मुंबई इंडियन्सच्या टीमकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम बॉलिंग केली. हार्दिक पांड्याने 2 ओव्हर्समध्ये केवळ 9 रन्स देत एक विकेट घेतली.
 
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु: २० षटकांत ५ बाद १४२ धावा(विराट कोहली ६२,ख्रिस
गेल २२,डिव्हिलियर्स १९, पवन नेगी नाबाद १३, केदार जाधव ९,मॅक्लेनघन
२/२०, हार्दिक पांड्या १/९, कुणाल पांड्या १/२१.)
मुंबई इंडियन्स: १८.५ षटकांत ६ बाद १४५ धावा (कीरोन पोलार्ड ७०,कुणाल
पांड्या नाबाद ३७, नीतिश राणा ११, हार्दिक पांड्या नाबाद ९,सॅम्युअल
बद्री ४/९,स्टुअर्ट बिन्नी१/१४, यजुवेंद्र चहल १/३१.)
 

Web Title: Badri "Dulhania" caught by Mumbai, hat-trick of victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.