बेली, स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलिया २ बाद २३४

By admin | Published: January 12, 2016 08:38 AM2016-01-12T08:38:56+5:302016-01-13T00:22:57+5:30

जॉर्ज बेली आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २३४ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी ११ षटकांत ७६ धावांची गरज आहे

Bailey, Smith's century, Australia 234 for 2 | बेली, स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलिया २ बाद २३४

बेली, स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलिया २ बाद २३४

Next

ऑनलाइन लोकमत 

पर्थ, दि. १२ - जॉर्ज बेली आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २३४ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी ११ षटकांत ७६ धावांची गरज आहे.  प्रारंभी दोन गडी झटपट बाद करुन यश मिळवल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा संघर्ष सुरु झाला आहे.
भारताच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २१ धावात दोन गडी बाद झाले होते. भारताचा वेगवान गोलंदाज सरनने दोन्ही गडी बाद केले. सलामीवीर एरॉन फिंचला (८) धावांवर आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर आक्रमक वॉर्नरला (५) धावांवर कोहलीकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाच्या ४.४ षटकात २ बाद २१ धावा झाल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्माच्या शानदार दीडशतकी (नाबाद १७१) खेळीमुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहितने १६३ चेंडूंमध्ये १७१ धावा ठोकत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला. ऑस्ट्रेलियातर्फे फॉकनरने २ तर हेझलवूडने १ बळी टिपला. 
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय रोहितने सार्थ ठरवला. शिखर धवन (९) बाद झाल्याने भारताला सुरूवातीलाच (१ बाद ३६) धक्का बसला. मात्र त्यानंतर रोहितने शानदार फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला, त्याला विराट कोहलीने (९१) चांगली साध दिली. रोहितने १२२ चेंडूमध्ये शतक ठोकले. त्याची व विराटची जोडी खेळपट्टीवर चांगली जमलेली असतानाच फॉकनरच्या गोलंदाजीवर फिंचच्या हातात चेंडू देऊन कोहली ९१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला, तो सावध खेळ करत असतानाच दुसरीकडे रोहित शर्माची फटकेबाजी सुरूच होती, बघता बघता त्याने दीडशतकही पूर्ण केले. मात्र ४८.२ षटकांत कर्णधार धोनी (१८) धावांवर बाद झाला. रोहित शर्माने भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला आणि त्यामुळे ५० व्या षटकाअखेर भारताने ३ बाद ३०९ धावा केल्या. 
 
पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर झालेल्या या सामन्यात भारताकडून बारिंदर सरन पदार्पण करत असून, इशांत शर्माच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे तसेच मनिष पांडेलाही संघात स्थान देण्यात आले आहे. 
भारताने याआधीच्या पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला आहे. त्यात एक टी-२० व एक वन-डे सामन्यांचा समावेश होता. पाहुण्या संघाला या मालिकेत स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाकडून यापेक्षा कडवे आव्हान मिळणार आहे, हे निश्चित.
धोनीसाठी काही अंशी दिलासा देणारी बाब म्हणजे आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. याव्यतिरिक्त मिशेल स्टार्क दुखापतग्रस्त आहे तर मिशेल जॉन्सनने निवृत्ती स्वीकारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या जोश हेजलवुड, जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड आणि जिमी फॉकनर अनुभवाच्या बाबतीत कमकुवत भासतात.
 

Web Title: Bailey, Smith's century, Australia 234 for 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.