बजरंगला सुवर्णपदक, विनेश अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:20 AM2019-08-11T04:20:39+5:302019-08-11T04:20:57+5:30
भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला.
नवी दिल्ली : भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रांपीमध्ये गेल्या वर्षी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बंजरंग याने पुरूषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला २ -० अशी मात दिली.
बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या ५३ किलो गटात स्थानिक पहेलवान याफ्रेमेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात ११-० असे पराभूत केले. दुसºया हाफमध्ये विनेश जास्त आक्रमक राहिली.
विनेश हिने सुरुवातीला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डाव्या पायावर हल्ला केला. मात्र ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. बेलारुसच्या खेळाडूने फारसा चांगला खेळ केला नाही. त्याचा फायदा विनेश हिला मिळाला.