आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बजरंग व पिंकी यांना सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 06:54 PM2018-07-29T18:54:29+5:302018-07-29T18:54:48+5:30
बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली, तर संदीप तोमरनेही रौप्यपदकाची कमाई केली.
नवी दिल्ली - बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली, तर संदीप तोमरनेही रौप्यपदकाची कमाई केली. इस्तानबुल येथे झालेल्या यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीयांनी एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत.
पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला येथे अपयशाचा सामना करावा लागला. तिला 62 किलो वजनी गटाच्या पदक फेरीतही प्रवेश मिळवता आलेला नाही.
राष्ट्रकुल विजेत्या बजरंगने महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने रविवारी 70 किलो गटाचे सुवर्ण नावावर केले. युक्रेनच्या अँड्रीय केव्हात्कोवस्कीने दुखापतीमुळे माघार घेतली. 61 किलो वजनी गटात संदीपला इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने 8-2 अशी धुळ चारली.
Heartiest thanks to all of you for your blessings and wishes . Keep your wishes on me like this for the upcoming Asian Games ...🇮🇳🤼♂️ Jai Hind pic.twitter.com/x1UyU7WxMi
— Bajrang Punia (@BajrangPunia) July 29, 2018