बजरंगकडे भारताचे नेतृत्व, २३ वर्षांखालील विश्व कुस्ती, काळे, माने संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:26 AM2017-11-21T03:26:17+5:302017-11-21T03:26:32+5:30
नवी दिल्ली : आशियाई विजेता बजरंग पुनिया हे २३ वर्षांखालील विश्व कुस्ती स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
नवी दिल्ली : आशियाई विजेता बजरंग पुनिया हे २३ वर्षांखालील विश्व कुस्ती स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा २४ सदस्यीय संघ पाठवण्यात आला आहे. ६ दिवस चालणाºया या स्पर्धेत फ्रीस्टाइल, महिला आणि ग्रीको-रोमनचे आठ-आठ वजन गटातील सामने खेळविण्यात येतील. बजरंग (६५ किलो गट) सोबतच पुरुषांच्या संघात के. उत्कर्ष काळे (५७ किलो), आणि दिनेश (७४ किलो) हे आपल्या गटातील दावेदार आहेत. या वर्षी पॅरिस येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमधून रिकाम्या हाताने परतलेला बजरंग या स्पर्धेत आपली छाप सोडण्यास उत्सुक आहे. संघ असा : पुरुष फ्रीस्टाइल : उत्कर्ष काळे (५७ किलो), रविंदर (६१ किलो), बजरंग पुनिया (६५), विनोद कुमार (७० किलो), दिनेश (७४ किलो), दीपक (८६ किलो), विक्की (९७ किलो), पुष्पेंद्र सिंह (१२५ किलो). महिला : ऋतु फोगाट (४८ किलो), पिंकी (५३ किलो), ललिता (५५ किलो), संगीता (५८ किलो), सरिता (६० किलो), रेश्मा माणे (६३ किलो), दिव्या काक्रान (६९ किलो), पूजा (७५ किलो). ग्रीको-रोमन : ज्ञानेंद्र (५९ किलो), मनीष (६६ किलो), योगेश (७१ किलो), मनजीत (७५ किलो ), दीपक गुलिया (८० किलो), सुनील (८५ किलो) सुमित (९८ किलो) मेहर सिंह (१३० किलो).