बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:07 PM2018-12-23T19:07:57+5:302018-12-23T19:09:57+5:30

लढाण्याच्या  बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली.

Bala Rafiq Shaikh becomes Maharashtra Kesari Honor | बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

googlenewsNext

जालना : बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या  बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.

अभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.

पुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.

'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते?

पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.

Web Title: Bala Rafiq Shaikh becomes Maharashtra Kesari Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.