बंगळुरूला ‘हैदराबादी हिसका’!

By admin | Published: April 14, 2015 12:55 AM2015-04-14T00:55:55+5:302015-04-14T00:55:55+5:30

शिखर धवनचे (५०) नाबाद, तर डेव्हिड वॉर्नरचे (५७) धडाकेबाज अर्धशतक यांच्या जोरावर सनरायझर्सने रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरूला विजयाचा ‘हैदराबादी हिसका’ दाखविला.

Bangalore's 'Hyderabadi Hijka'! | बंगळुरूला ‘हैदराबादी हिसका’!

बंगळुरूला ‘हैदराबादी हिसका’!

Next

शिखर, वॉर्नर यांची अर्धशतके : ८ गडी राखून मात
बंगळुरू : शिखर धवनचे (५०) नाबाद, तर डेव्हिड वॉर्नरचे (५७) धडाकेबाज अर्धशतक यांच्या जोरावर सनरायझर्सने रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरूला विजयाचा ‘हैदराबादी हिसका’ दाखविला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात हैदराबादने बंगळुरूचे १६७ धावांचे आव्हान १६ चेंडू आणि ८ गडी राखून गाठले. या विजयात के. एल. राहुल याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने ४४ धावांची नाबाद खेळी केली.
बंगळुरूच्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनरायर्झ हैदराबादने आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि शिखर या जोडीने पहिल्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. या धावा त्यांनी अवघ्या ८ षटकांतच गाठल्या. यामध्ये सर्वाधिक योगदान दिले ते वॉर्नरने. त्याने बंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या २७ चेंडूंत ५७ धावा फटकावल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. चहलच्या चेडूवर वॉर्नर पायचित बाद झाला. मात्र, तोपर्यंत हैदराबादने विजयाचा मार्ग सोपा केला होता. वॉर्नरपाठोपाठ विल्यम्सन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर के. एल. राहुलने शिखर धवनला उत्कृष्ट साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ७८ धावांची नाबाद भागीदारी केली. यामध्ये शिखर धवनने ४२ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याने आपले अर्धशतक फ्री हिटवर षटकार ठोकूनच पूर्ण केले. राहुलने २८ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बंगळुरूकडून चहलने सर्वाधिक २ बळी घेतले.
त्याआधी, कर्णधार विराट कोहली (४१) आणि एबी डिव्हिलियर्स (४६) यांच्या बळावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादपुढे १६७ धावांचे ‘चॅलेंज’ उभे होते. विराट कोहलीने ३७ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. त्यानंतर डिव्हिलियर्स आणि गेल (२१) यांच्या योगदानामुळे बंगळुरूला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
चिन्नास्वामी स्टेडियमवरील या सामन्यात सनरायर्झ हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय कोहली आणि गेल ही जोडी अपयशी ठरवणार, असे वाटत होते. गेल्या सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या ख्रिस गेलने विराटसोबत ५० धावांची भागीदारी केली. त्यात त्याने १६ चेंडूंत २१ धावा केल्या. यात त्याच्या ३ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.गेलचा हा अडथळा प्रवीण कुमारने दूर केला. त्यानंतर दिनेश कार्तिक झेलबाद झाल्यावर विराट कोहलीवर जबाबदारी येऊन ेपडली. कोहली व डिव्हिलियर्सने संघाला ९३ धावसंख्येपर्यंत आणले. बोपाराच्या चेंडूंवर कोहली त्रिफळाचीत झाला. त्यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसला. त्यानंतर मनदीपसिंग (०), डॅरेन सॅमी (६) झटपट बाद झाले. त्यामुळे आरसीबी ५ बाद १२५ अशा स्थितीत सापडला. तळात अ‍ॅबोटने ९ चेंडूंत १४ धावा फटकावल्या. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर आरसीबीची धावगती कमी झाली. अखेर त्यांनी १६६ धावसंख्येपर्यंत मजल मारली. (वृत्तसंस्था)

रॉयल चॅलेजर्स बंगळुरू : ख्रिस गेल झे. आशिष रेड्डी गो. प्रवीण कुमार २१, विराट कोहली ब्त्रि. गो. बोपारा ४१, दिनेश कोर्तिक झे. विलियिम्सन गो. शर्मा ९, एबी डिव्हिलियर्स झे. धवन गो. बोल्ट ४६, मनदीप सिंग झे. वॉर्नर गो. बोपारा ०, डॅरेन सॅमी त्रि. गो. आशिष रेड्डी ६, सीन अबोट झे. शर्मा गो. बोल्ट १४, हर्षल पटेल झे. विलियिम्सन गो. बोल्ट २, अबू नेचिम अहमद त्रि. गो. भुवनेश्वर ४, वरुण अ‍ॅरोन त्रि. गो. भुवनेश्वर ६, युजवेंद्र चहल नाबाद १; अवांतर : १६; एकूण : १९.५ षटकात सर्व बाद १६६; गोलंदाजी : ट्रेन्ट बोल्ट ४-०-३६-३, भुवनेश्वर कुमार ३.५-०-३०-२, प्रवीण कुमार ४-०-३४-१, रवी बोपारा ३-०-३१-२, कर्ण शर्मा ४-०-२०-१, आशिष रेड्डी १-०-११-१.
सनराइझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. चहल ५७, शिखर धवन नाबाद ५०, केन विलियिम्सन यष्टीचीत कार्तिक गो. चहल ५, लोकेश राहुल नाबाद ४४; अवांतर : १६; एकूण : १७.२ षटकांत २ बाद १७२; गोलंदाजी : सीन एबट २-०-२१-०, हर्षल पटेल २-०-२३-०, वरुण अ‍ॅरोन ३.२-०-३६-०, अबू नेचिम अहमद ४-०-४१-०, डॅरेन सॅमी २-०-१८-०, यजुवेंद्र चहल ४-०-२८-२.

Web Title: Bangalore's 'Hyderabadi Hijka'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.