बांगलादेशचा ङिाम्बाब्वेविरुद्ध नाटय़मय 3 गडी राखून विजय

By admin | Published: October 28, 2014 01:09 AM2014-10-28T01:09:46+5:302014-10-28T01:09:46+5:30

ताजुल इस्लामने (8-39) कारकार्दीतील सवरेत्तम कामगिरी केल्यानंतर विषम परिस्थितीमध्ये नाबाद 15 धावांची महत्त्वाची खेळी केली

Bangladesh beat defending champions by 3 wickets | बांगलादेशचा ङिाम्बाब्वेविरुद्ध नाटय़मय 3 गडी राखून विजय

बांगलादेशचा ङिाम्बाब्वेविरुद्ध नाटय़मय 3 गडी राखून विजय

Next
मीरपूर : ताजुल इस्लामने (8-39) कारकार्दीतील सवरेत्तम कामगिरी केल्यानंतर विषम परिस्थितीमध्ये नाबाद 15 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि यजमान बांगलादेशला ङिाम्बाब्वेविरुद्ध आज संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवून दिला. 1क्1 धावांच्या छोटय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे आघाडीचे तीन फलंदाज शून्यावरच माघारी परतले होते.
ताजुलच्या अचूक मा:याच्या जोरावर बांगलादेशने ङिाम्बाब्वेचा दुसरा डाव 114 धावांत गुंडाळला. ङिाम्बाब्वेने बांगलादेशपुढे विजयासाठी 1क्1 धावांचे लक्ष्य ठेवले. हे छोटे लक्ष्य बांगलादेश संघाला पहाडाप्रमाणो भासत होते. डावाच्या पहिल्या 25 चेंडूंमध्ये बांगलादेशचे आघाडीचे तीन फलंदाज तमीम इक्बाल, शमशुर रहमान व मोमिनुल हक पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यावेळी बांगलादेशने दुस:या डावात धावांचे खातेही उघडले नव्हते. त्यानंतर महमुदुल्ला (28) व शाकिब अल-हसन (15) यांनी चौथ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर बांगलादेशची पुन्हा 7 बाद 82 अशी घसरगुंडी उडाली. कर्णधार मुशफिकर रहीम (नाबाद 23) याने एक टोक सांभाळले. अखेर त्याला ताजुलने योग्य साथ दिली. यांनी ङिाम्बाब्वेच्या मा:याला समर्थपणो सामोरे जाताना बांगलादेशला विजय मिळवून दिला. ङिाम्बाब्वेतर्फे एल्टन चिगुम्बुरा (4-21) आणि टिनसे पेनयांगरा (2-3क्) यशस्वी गोलंदाज ठरले. 
ताजुलने रहीमसोबत आठव्या विकेटसाठी 19 धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यात ताजुलचा वाटा 15 धावांचा होता. ताजुलने 23 चेंडूंना सामोरे जाताना 2 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 15 धावा फटकाविल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा ताजुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. बांगलादेशचा 86 व्या कसोटी सामन्यातील हा केवळ 5 वा विजय आहे. ङिाम्बाब्वेविरुद्ध बांगलादेशने आज तिसरा विजय मिळविला. बांगलादेशने मायदेशात दुस:यांदा कसोटी विजय साकारला. यापूर्वी 2क्क्5 मध्ये चटगावमध्ये बांगलादेशने ङिाम्बाब्वेचा 226 धावांनी पराभव केला होता. बांगलादेशने प्रथमच तीन दिवसांमध्ये कसोटी विजय साकारला. बांगलादेशने हबीबूल बशर, मशर्रफ मुर्तजा व शाकिब अल-हसन यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी एक कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)
 
संक्षिप्त धावफलक : 
4ङिाम्बाब्वे : पहिला डाव : सर्वबाद 24क् (सिकंदर राजा 51, बीआरएम टेलर 28, इ. चिगुंबरा 29, सी.आर.इर्विने 34, आरडब्लू चाकाबोवा 25, शाकिब अलहसन 6/59, जुबेर हुसेन 2/58); बांगलादेश : पहिला डाव सर्वबाद 254 (मोनिनुल हक 53, महमुद्दुल्ला 63, मुशफिकर रहिम 64,  टिनसे पेनयांगरा  5/59); ङिाम्बाब्वे : दुसरा डाव : सर्वबाद 114 (सिकंदर राजा 25, बीआरएम टेलर नाबाद 45, ताजुल इस्लाम 8/39); बांगलादेश : दुसरा डाव : 33.3 षटकात 7 बाद 1क्1 (महमुद्दुल्ला 28, शाकिब अल हसन 15, मुशफिकर रहिम नाबाद 23, चिगुम्बुरा 4/21, टिनसे पेनयांगरा 2/3क्)

 

Web Title: Bangladesh beat defending champions by 3 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.