बांगलादेश फायनलमध्ये; पाकिस्तान ‘आऊट’

By admin | Published: March 3, 2016 04:09 AM2016-03-03T04:09:58+5:302016-03-03T04:09:58+5:30

सलामीवीर सौम्य सरकार (४८) याची शानदार खेळी आणि त्यानंतर कर्णधार मशर्रफे मोर्तझा (नाबाद १२) व महमुदुल्लाह (नाबाद २२) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर बांगलादेशाने रोमहर्षक

Bangladesh in final Pakistan 'out' | बांगलादेश फायनलमध्ये; पाकिस्तान ‘आऊट’

बांगलादेश फायनलमध्ये; पाकिस्तान ‘आऊट’

Next

मिरपूर : सलामीवीर सौम्य सरकार (४८) याची शानदार खेळी आणि त्यानंतर कर्णधार मशर्रफे मोर्तझा (नाबाद १२) व महमुदुल्लाह (नाबाद २२) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर बांगलादेशाने रोमहर्षक अंदाजात बुधवारी पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करताना आशिया कप ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १३० धावांचे लक्ष्य बांगलादेशाने १९.१ षटकांत ५ गडी गमावून १३१ धावा करून पूर्ण केले. स्पर्धेत सलग ३ विजयांसह भारताने आधीच अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. आता त्यांची विजेतेपदाची लढत यजमान बांगलादेशाशी होणार आहे.
बांगलादेशाकडून सौम्य सरकारने ४८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ४८ धावा केल्या. विजयी चौकार मारणाऱ्या महमुदुल्लाहने १५ चेंडूंत २ चौकार व एक षटकार मारला, तर कर्णधार मोर्तझाने ७ चेंडूंत २ चौकार मारले. शब्बीर रहमानने १४ व यष्टिरक्षक फलंदाज मुश्फिकर रहीमने १२ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून मोहंमद आमिरने ४ षटकांत २६ धावा देऊन २ गडी बाद केले. मोहंमद इरफान, कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि अनुभवी शोएब मलिक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
त्याआधी, बांगलादेशाने आशिया चषक ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला २० षटकांत १२९ धावांत रोखले. पाकिस्तानकडून सर्फराज अहमदने ४२ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. शोएब मलिकने ३० चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह ४१ धावा फटकावल्या. बांगलादेशाकडून अल अमीन हुसेन याने २५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला अराफत सन्नी याने ३५ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली. तस्कीन अहमद आणि मोर्तझा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकीचा ठरवताना बांगलादेशाच्या गोलंदाजांनी ८.२ षटकांतच त्यांची अवस्था ४ बाद २८ अशी दयनीय केली. अखेर सर्फराज अहमद आणि शोएब मलिक यांनी पाचव्या गड्यासाठी ४४ चेंडूंत केलेल्या ७० धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १२९ पर्यंत मजल मारता आली.
धावफलक : पाकिस्तान : खुर्रम मन्झूर झे. मुशफिकुर रहीम गो. अल अमीन हुसेन १, शर्जील खान त्रि. गो. अराफत सन्नी १०, मोहंमद हाफीज पायचीत गो. मोर्तझा २, सर्फराज अहमद नाबाद ५८, उमर अकमल झे. शकीब अल हसन गो. तस्कीन अहमद ४, शोएब मलिक झे. शब्बीर रहमान गो. अराफत सन्नी ४१, शाहीद आफ्रिदी झे. शब्बीर रहमान गो. अल अमीन हुसेन ०, अन्वर अली झे. शब्बीर रहमान गो. अल अमीन हुसेन १३, अवांतर : ०, एकूण : २० षटकांत ७ बाद १२९. गोलंदाजी : तस्कीन अहमद ४-१-१४-१, अल अमीन हुसेन ४-०-२५-३, अराफत सन्नी ४-०-३५-२, मशर्रफे मोर्तझा ४-०-२९-१, शकीब अल हसन ४-०-२६-०.
बांगलादेश : तमीम इकबाल पायचीत गो. इरफान ७, सौम्य सरकार त्रि. गो. आमिर ४८, शब्बीर रहमान त्रि. गो. आफ्रिदी १४, मुश्फिकर रहीम पायचीत गो. मलिक २२, शकीबुल हसन त्रि. गो. आमीर ८, महमुदुल्लाह नाबाद २२, मोर्तझा नाबाद १२, अवांतर : ८. एकूण : १९.१ षटकांत ५ बाद १३१. गोलंदाजी : आमिर ४-०-२६-२, इरफान ४-०-२३-१, सामी ४-०-३०-०, आफ्रिदी ४-०-२०-१, अली २.१-०-२५-०, मलिक १-०-३-१.

Web Title: Bangladesh in final Pakistan 'out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.