बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

By admin | Published: September 30, 2015 11:31 PM2015-09-30T23:31:32+5:302015-09-30T23:31:32+5:30

गेल्या काही कालावधीपासून चढ-उतारांतून जाणारा वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडमध्ये २०१७मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला

Bangladesh qualify for Champions Trophy | बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

Next

दुबई : गेल्या काही कालावधीपासून चढ-उतारांतून जाणारा वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडमध्ये २०१७मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला. या संघाला ३० सप्टेंबर २०१५पर्यंत एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळे हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार नाही.
१९९८मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर या स्पर्धेत कॅरेबियन देश सहभागी न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, बांगलादेशाचा संघ या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ते २००६नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळतील. इंग्लंडमध्ये १ ते १८ जून २०१७ दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी ८ संघ निश्चित झाले आहेत.
बांगलादेशाचा संघ याआधी अखेरच्या वेळी भारतातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या वेळी पात्रता फेऱ्यादेखील होत होत्या. ते त्या वेळी श्रीलंकेकडून ३७ आणि वेस्ट इंडीजकडून १० गडी राखून पराभूत झाले होते. त्यांनी एकमेव विजय झिम्बाब्वेविरुद्ध १०१ धावांनी मिळविला होता.
आयसीसी वन डे वर्ल्डकप २०१५पासून बांगलादेशाचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. त्यांनी पाकिस्तान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. त्यामुळे ते आयसीसी वन डे रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर पोहोचले.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. त्यासाठी २ गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरी गाठतील. गट आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नंतर घोषित करण्यात येईल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७साठी संघ निश्चित झाले असून, आता पुढील महत्त्वपूर्ण बाब ही क्वालिफिकेशनचे वेळापत्रक व आयसीसी वन डे रँकिंग असेल. त्यात ३० सप्टेंबर २०१७पर्यंत अव्वल ८ संघ आयसीसी वर्ल्डकप २०१९साठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यानंतर ४ संघांना आयसीसी वर्ल्डकप क्वालिफायर खेळण्याची संधी मिळेल. त्यात आयसीसी क्रिकेट लीग चॅम्पियनशिप आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन-२ यांतून पुढे जाणारे संघ सहभागी होतील.(वृत्तसंस्था)
------------------------
आयसीसी वनडे टीम रँकिंग (३० सप्टेंबर २०१५नुसार) :
१. आॅस्ट्रेलिया (१२७ गुण), २. भारत (११५ गुण), ३. दक्षिण आफ्रिका (११० गुण), ४. न्यूझीलंड (१०९ गुण), ५. श्रीलंका (१०३ गुण), ६. इंग्लंड (१०० गुण), ७. बांगलादेश (९६ गुण), ८. पाकिस्तान (९० गुण), ९. वेस्ट इंडीज (८८ गुण), १०. आयर्लंड (४९ गुण), ११. झिम्बाब्वे (४५ गुण) व १२. अफगाणिस्तान (४१ गुण).
------------
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये जे ८ संघ पात्र ठरले आहेत
रँकिंगनुसार आॅस्ट्रेलिया (विद्यमान चॅम्पियन),
भारत (१९९८चा विजेता) च्दक्षिण आफ्रिका (२०००चा चॅम्पियन)
न्यूझीलंड (२००२चा संयुक्त विजेता)
श्रीलंका, यजमान इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

Web Title: Bangladesh qualify for Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.