बांगलादेशाने परदेशातही जिंकून दाखवावे : बॉयकॉट
By admin | Published: June 24, 2015 11:38 PM2015-06-24T23:38:19+5:302015-06-24T23:38:19+5:30
बांगलादेशाचा संघ पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. मात्र, त्यांनी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवून स्वत:ला सिद्ध करून
लंडन : बांगलादेशाचा संघ पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. मात्र, त्यांनी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवून स्वत:ला सिद्ध करून दाखवायला हवे, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी व्यक्त केले.
घरच्या मैदानावर पाकिस्तान, झिम्बाब्वे व भारताला पराभूत केल्याने बांगलादेश चर्चेत आला आहे. मात्र, बॉयकॉटच्या मते इतक्या लवकर बांगलादेशाबाबत काही मत बनविणे योग्य नाही. ते म्हणाले, ‘‘बांगलादेशाला आता कमजोर संघ म्हणता येणार नाही. त्यांनी सध्या काही सामने खूप चांगल्या पद्धतीने जिंकले आहेत. मात्र, भारत, पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्ध सामने जिंकल्यामुळे खूप फरक पडत नाही. कारण हे सर्व सामने त्यांनी त्यांच्या देशात जिंकले आहेत. जर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश एक मजबूत संघ असल्याचा संदेश द्यायचा असेल, तर न्यूझीलंड, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन पराभूत करावे लागेल. तोपर्यंत बांगलादेशाची मोठ्या संघांबरोबर तुलना केली जाऊ शकत नाही, असे बॉयकॉट म्हणाले. (वृत्तसंस्था)