बांगलादेशच्या ५ बाद २२१ धावा

By admin | Published: October 22, 2016 01:05 AM2016-10-22T01:05:10+5:302016-10-22T01:05:10+5:30

बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तिन्ही सत्रांमध्ये अखेरच्या क्षणी विकेट गमावल्या असल्या तरी सलामीवीर तमीम इक्बालच्या

Bangladesh total of 221 runs | बांगलादेशच्या ५ बाद २२१ धावा

बांगलादेशच्या ५ बाद २२१ धावा

Next

चितगाव : बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तिन्ही सत्रांमध्ये अखेरच्या क्षणी विकेट गमावल्या असल्या तरी सलामीवीर तमीम इक्बालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात २९३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा फटकावल्या. बांगलादेशला इंग्लंडची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी ७२ धावांची गरज असून त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा दोन षटकांचा खेळ शिल्लक असताना बांगलादेशने कर्णधार मुशफिकर रहीमला (४८) गमावले. त्याला बेन स्टोक्सने माघारी परतवले. तमीम इक्बालने (७८) बांगलादेशचा डाव सावरला. बांगलादेशने उपहारापूर्वी अखेरच्या षटकात इमुरुल कायेस (२१) आणि मोमिनुल हक (०) यांच्या विकेट गमावल्या. आॅफ स्पिनर मोईन अलीने (२-६६) या दोघांना तंबूचा मार्ग दाखवला.
त्यानंतर तमीम व महमुदुल्ला (३८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. चहापानाला खेळ थांबण्यापूर्वी महमुदुल्ला याला आदिल राशिदने बाद केले. तमीमचा अडथळा गॅरेथ बॅटीने दूर केला. बांगलादेशची भिस्त अष्टपैलू शाकिब अल हसनवर अवलंबून आहे. शाकिब ३१ धावा काढून खेळपट्टीवर असून त्याला दुसऱ्या टोकावर शफीउल इस्लाम (०) खाते न उघडता साथ देत होता.
त्याआधी, कालच्या ७ बाद २५८ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने आज ३५ धावा जोडून उर्वरित ३ फलंदाज गमावले. पहिला कसोटी सामना खेळणारा बांगलादेशचा १८ वर्षीय आॅफ स्पिनर मेहदी हसनने स्टुअर्ट ब्रॉडला बाद करीत इंग्लंडचा डाव गुंडाळला. मेहदीने ८० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. डावखुरा फिरकीपटू ताईजुल इस्लामने उर्वरित दोन फलंदाजांना माघारी परतवले. त्याने ख्रिस व्होक्स (३६) व आदिल राशिद (२६) यांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)

Web Title: Bangladesh total of 221 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.