बांगलादेश इंग्लंडविरुद्ध तटस्थ स्थळी खेळणार नाही

By admin | Published: July 11, 2016 08:17 PM2016-07-11T20:17:45+5:302016-07-12T13:06:02+5:30

बांगलादेश क्रिकेट मंडळाने इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत तटस्थ स्थळावर खेळण्याविषयीची शक्यता नव्याने फेटाळून लावली आहे.

Bangladesh will not play neutral against England | बांगलादेश इंग्लंडविरुद्ध तटस्थ स्थळी खेळणार नाही

बांगलादेश इंग्लंडविरुद्ध तटस्थ स्थळी खेळणार नाही

Next

ऑनलाइन लोकमत

ढाका, दि. 11- बांगलादेश क्रिकेट मंडळाने इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत तटस्थ स्थळावर खेळण्याविषयीची शक्यता नव्याने फेटाळून लावली आहे. मंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक निजामुद्दीन चौधरी म्हणाले, ह्यह्यस्पर्धेचे आयोजन एखाद्या तटस्थ ठिकाणी केले जाणे हा काही पर्याय नाही असे आमचे मत आहे. कोणत्याही देशात क्रिकेट थांबवले जाऊ नये. आम्ही आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी सातत्याने चर्चा करीत आहोत.
१ जुलै रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २0 परदेशी नागरिकांचे निधन झाले होते. याविषयी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने चिंता व्यक्त करताना आॅक्टोबरमध्ये होणारी मालिका एखाद्या तटस्थ स्थळी आयोजित करण्याचा विचार व्यक्त केला होता. इंग्लंडला बांगलादेश दौऱ्यात तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
चौधरी म्हणाले, ह्यह्यइंग्लंडचे एक सुरक्षा पथक गेल्या महिन्यात येणार होते; परंतु इंग्लंडला बांगलादेशनंतर भारताचा दौरादेखील करायचा आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही देशातील सुरक्षेची पाहणी बरोबरच करायला हवी, असे मला वाटते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमचा रेकॉर्ड खूप चांगला आहे.
बांगलादेशात सुरक्षेचा विषय नेहमीच एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. आॅस्ट्रेलियाने सुरक्षिततेच्या कारणामुळे गेल्या वर्षी आपला दौरा रद्द केला होता आणि त्यानंतर अंडर १९ वर्ल्डकपमधूनदेखील माघार घेतली होती.

 

Web Title: Bangladesh will not play neutral against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.