बांगला देश विजयी
By Admin | Published: July 16, 2015 03:56 PM2015-07-16T15:56:25+5:302015-07-16T15:56:25+5:30
बांगला देशचा ऐतिहासिक विजय
ब ंगला देशचा ऐतिहासिक विजयवन डे : द. आफ्रिकेला लोळवित २-१ ने मालिका जिंकलीढाका : सौम्या सरकार (९०) आणि तमीम इक्बाल(नाबाद ६१) यांची शानदार खेेळी तसेच सलामीला केलेल्या १५४ धावांच्या भागीदारीच्या बळावर बांगला देशने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत बुधवारी द. आफ्रिकेचा नऊ गड्यांनी धुव्वा उडवित २-१ ने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात द. आफ्रिकेच्या डावात षटकांची संख्या कमी झाली. हा सामना ४०-४० षटकांचा खेळविण्यात आला. बांगला देशने द. आफ्रिकेला नऊ बाद १६८ असे रोखले. त्यांनतर डकवर्थ- लुईस नियमानुसार बांगला देशला १७० धावांचे विजयी लक्ष्य देण्यात आले. ते त्यांनी २६.१ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात १७० धावा करीत गाठले. बांगला देशचा द. आफ्रिकेवर हा एकूण तिसरा आणि सर्वांत मोठा विजय ठरला. बांगला देशने आज सलग चौथी मालिका मायभूमीत जिंकण्याचाही विक्रम नोंदविला. यासोबतच या संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीटही पक्के केले.सरकार आणि तमीम यांनी सलामीला १४४ चेंडूत १५४ धावांची विजयी भागीदारी केली. सरकारने ७४ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह ९० धावा तर तमीमने ७७ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ६६ धावा ठोकल्या. त्याआधी मधल्या फळीतील फलंदाज जेपी ड्युमिनी (५१) आणि डेव्हिड मिलर (४४) यांनी ६३ धावांची भागीदारी करीत द. आफ्रिकेला ४० षटकांत ९ बाद १६८ पर्यंत मजल गाठून दिली. पाहुण्या संघावर नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय चांगलाच अंगलट आला. त्यांचे १५ षटकांत ५० धावांत आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर २३ षटकांत ४ बाद ७८ अशी स्थिती होती. तोच पावसाचे आगमन झाल्याने दोन तासांचा खेळ वाया गेला. खेळ सुरू झाला तेव्हा षटकांची संख्या ४० करण्यात आली. ड्युमिनी आणि मिलर यांनी सावध खेळून ११३ पर्यंत डाव खेचला. ड्युमिनीने ७० चेंडूचा सामना केला. मिलरने ५१ चेंडू खेळून पाच चौकार मारले. बांगला देशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. रुबेल हुसेन आणि मुस्तफिजूर रहमान यांनी प्रत्येकी दोन तसेच मुशर्रफ मूर्तझा व महमदुल्लाह यांनी देखील एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)