बांगलादेशला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य
By admin | Published: June 9, 2017 08:04 PM2017-06-09T20:04:05+5:302017-06-09T20:04:05+5:30
करा किंवा मराच्या लढतीत बांगलादेशच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 265 धावांपर्यंत मजल मारु शकला.
ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 9 : करा किंवा मराच्या लढतीत बांगलादेशच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 265 धावांपर्यंत मजल मारु शकला. या सामन्यात बाजी मारणारा संघ ह्यअह्ण गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या तसेच बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांचा प्रत्येकी एक गुण आहे. दोघांना इंग्लंडने पराभवाची चव चाखविली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पावसामुळे दोन्ही संघांना एका गुणावर समाधान मानावे लागेल.
नाणेफेक जंकून प्रथम फलंदाजी स्विकारणाऱ्या न्यूझीलंडला बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जखडून ठेवले. बांगलादेशकडून मोसादेन हुसैन सैकतने धारधार गोलंदाजी करताना तीन षटकात न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसकीन अहमदने आपल्या फिरकिच्या बळावर दोन गडी बाद केले. मुस्तफिझिकूर रेहमान आणि रूबेल हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी बाद केले.
न्यूझीलंडकडून अनुभवी रॉस टेलरने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यम्सने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघाव्यतिरीक्त एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला आपली कमाल दाखवता आली नाही. गुप्तील 33, रॉन्ची 16, नील ब्रूम 36, जेम्स निशाम 23 यांनी थोडाफार संघर्ष केला. अष्टपैलू कोरी अँडरसन भोपळाही न फोडता माघारी परतला.