अनुभवाच्या आधारे दिव्या देशमुखने मारली बाजी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:52 AM2017-09-03T03:52:12+5:302017-09-03T03:52:41+5:30
आकाश कवेत घेण्याचे स्वप्न सर्वंच बघत असतात पण ते साकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. चिमुकले हात लांब केले तर आकाशही कवेत घेता येते याची प्रचिती नागपूरची सर्वांत लहान वयाची फिडे मास्टर(वंडरगर्ल) बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीने आली आहे.
नागपूर : आकाश कवेत घेण्याचे स्वप्न सर्वंच बघत असतात पण ते साकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. चिमुकले हात लांब केले तर आकाशही कवेत घेता येते याची प्रचिती नागपूरची सर्वांत लहान वयाची फिडे मास्टर(वंडरगर्ल) बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीने आली आहे.
ब्राझीलच्या पोसोक डी काल्डास शहरात संपलेल्या विश्व कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांखालील गटात जेतेपदाला गवसणी घालणाºया या वंडरगर्लचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. याप्रसंगी विमानतळावर कुटुंबीय व चाहत्यांतर्फे पेढे भरवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. चिमुकल्या हातात विश्वविजेतेपदाचा चषक उंचावताना दिव्याच्या चेहºयावर आनंद झळकत होताच आणि डोळ्यात भविष्यात अनेक विजेतेपदाला गवसणी घालण्याचा विश्वासही दिसत होता, पण नागपूरच्या बुद्धिबळ विश्वात मानाचा तुरा खोवणाºया या चिमुकल्या बुद्धिबळपटूच्या स्वागताप्रसंगी
बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकाºयांची अनुपस्थिती मात्र मनाला चटका
लावून गेली. कल्याण बारट व दीपक पात्रीकर या पदाधिकाºयांव्यतिरिक्त दिव्याच्या स्वागतासाठी संघटनेचे पदाधिकारी विमानतळावर फिरकले नसल्याने आश्चर्य वाटले. मुंबईहून आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावरच दिव्याचे स्वागत केले आणि शाबासकीही दिली. यावेळी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित होत्या.
संत्रानगरीचा नावलौकिक वाढविणाºया या खेळाडू आम्हाला भूषणावह आहेत. सर्व खेळाडूंचा नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्याचा मानस असल्याचे यावेळी महापौर जिचकार यांनी सांगितले.
स्वागतानंतर ‘लोकमत’सोबत बोलताना दिव्या म्हणाली,‘‘यापूर्वी १० वर्षांखालील गटात विश्वविजेतेपदाचा मान मिळवला असल्यामुळे यावेळी माझ्यावर विशेष दडपण नव्हते. स्पर्धेसाठी तयारी उत्तम केली होती त्यामुळे यश मिळवण्याची आशा होती. मनोधैर्य उंचावलेले होते आणि सुरुवातही चांगली झाली, पण तिसºया फेरीत मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. चौथ्या फेरीपासून मात्र वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले आणि अखेर विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळाले. यापूर्वीच्या स्पर्धेचा अनुभव उपयुक्त ठरला.’’
स्पर्धेदरम्यान वडील डॉ. जितेंद्र देशमुख ब्राझीलला गेले होते. स्पर्धेतील अनुभव कथन करताना
ते म्हणाले,‘यावेळी माझ्यावर
विशेष दडपण नव्हते. दिव्याची कामगिरी सुरुवातीपासून चांगली झाली. या वयोगटात सुरुवातीला खेळाडूला पराभव स्वीकारावा
लागला तर मनोधैर्य उंचावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पण दिव्याच्या बाबतीत यावेळी मला त्याची
गरजच पडली नाही. त्यामुळे माझे काम सोपे झाले.’
विश्व कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची दिव्याची
ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४
मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये झालेल्या स्पर्धेत दिव्याने १० वर्षांखालील गटात विश्वविजेतेपदाचा मान मिळवला होता.
दिव्याचा विजेतेपदाचा प्रवास
११ व्या फेरीची लढत
बरोबरीत सोडवताना एकूण ९.५ गुणांसह जेतेपदावर शिक्कामोर्तब
दुसºया फेरीत चमकदार कामगिरीसह संयुक्तपणे
अव्वल स्थान
तिसºया फेरीअखेर चौथ्या
स्थानी घसरण
चौथ्या फेरीत मोठी झेप
घेताना दुसरे स्थान
पाचव्या फेरीच्या लढतीत
महिला फिडे मास्टर फिगुएरो बेरनल ज्युलिया डेनिसचा पराभव करीत साडेचार गुणांसह केली स्थिती बळकट
त्यानंतर नवव्या फेरीअखेर
एकमेव आघाडी घेतली होती.
उर्वरित दोन फेºयांमध्ये
आघाडी कायम ठेवत तिने विश्वविजेतेपद कायम राखले.
अकराव्या फेरीत आपल्याच अव्वल मानांकित रक्षिता रवीविरुद्धच्या लढतीत संयम दाखविताना एकूण साडेनऊ गुणांसह जेतेपद पटकावले.