basketball coach fight video: सामन्यानंतर खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी, 'हँडशेक' न केल्यामुळे नाराज झाली टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 09:01 PM2022-02-21T21:01:46+5:302022-02-21T21:02:37+5:30
एका बास्केटबॉल सामन्यानंतर हस्तांदोलन न केल्यामुळे हा हाणामारीचा प्रकार घडल्याची घटना घडली आहे.
मैदानात सामना सुरू असताना खेळाडूंनी खेळभावना दाखवणे गरजेचे असते. पण, अनेकवेळा काही अशा घटना घडतात, ज्यामुळे खेळाला गालबोट लागते. क्रिकेटमध्येही तुम्ही अनेकदा स्लेजींग किंवा तत्सम प्रकार पाहिले असतील. पण, एका सामन्यादरम्यान दोन संघांच्या खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करण्याची पद्धत असते, पण हस्तांदोलन न केल्यामुळेच हा वाद उद्भवला. दोन दिग्गज बास्केटबॉल प्रशिक्षकांमध्ये झालेल्या या वादामुळे हा हाणामारीचा प्रकार घडला. मिशिगनचे बास्केटबॉल प्रशिक्षक जुवान हॉवर्ड आणि विनकॉन्सिन प्रशिक्षक ग्रेग गार्ड यांच्यात हस्तांदोलनामुळे हा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.
A last-second dunk resulted in words being exchanged & a scuffle between @ORUMBB & NDSU during the postgame handshake.
— Cayden McFarland (@caydenmc) February 18, 2022
Paul Mills exchanged words with NDSU coaches and players.
Elijah Lufile was involved in the scuffle and had to be restrained from re-entering the fray. pic.twitter.com/Q5ZcHFD32D
नेमकं काय घडलं?
बास्केटबॉलचा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, यादरम्यान ग्रेग गार्ड जुवान हॉवर्ड यांना हस्तांदोलन करत नाहीत. यामुळे वाद होतो आणि यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना मारहाण सुरू करतात. ज्याप्रमाणे WWE मध्ये हाणामारी होते, त्याच प्रमाणे या संघांमध्ये हाणामारी होते. नॉर्थ डकोटा स्टेट आणि ओरल रॉबर्ट्सच्या खेळाडूंचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.