वर्णद्वेषाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:41 AM2020-06-06T11:41:02+5:302020-06-06T11:42:29+5:30
जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरू झाला...
जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरू झाला... कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराला पुन्हा एकदा वाचा फुटली आणि जगभरातून एक संतापाची लाट उसळली आहे. क्रीडा विश्वातील दिग्गजांकडूनही फ्लॉयड याच्या निधनाचा निषेध केला गेला. टेनिसपटू रॉजर फेडरर पासून ते क्रिकेटपटू डॅरेन सॅमी, ख्रिस गेल यांनीही वर्णद्वेषाविरोधात आवाज उचलला.
अनेक फुटबॉल क्लब्सनीही निषेध नोंदवताना अशा घटना रोखण्याचं आवाहन केलं. वर्णद्वेषाविरोधाचा हा लढा आणखी तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेतील दिग्गज बास्केटबॉलपटू ( NBA) मायकेल जॉर्डन यानं या लढ्याला बळकटी देण्यासाठी 100 मिलियन डॉलरचे म्हणजेच 700 कोटीहून अधिक रक्कमेची मदत जाहीर केली. वांशिक समानता आणि सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या संस्थांना हा निधी दिला जाणार असल्याची घोषणा जॉर्डन याने शनिवारी केली.
कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!
BA दिग्गज खेळाडूनं सोशल मीडियावर एक निवेदन जाहीर केले. त्यानं लिहिलं की,''अंतर्भूत वर्णद्वेषाचा नाश करण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांना पुढील दहा वर्षांच्या कालावधीत 700 कोटींचा निधी पुरवला जाईल.'' क्रीडापटूनं केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत म्हटली जात आहे. ''हे 2020 वर्ष आहे आणि आमचे कुटुंबीय इतरांना प्रेरणा देण्यासाठी काम करत आहे. अजून बऱ्याच गोष्टी बदलायच्या आहेत. Black lives matter हे काही वादग्रस्त विधान नाही. जोपर्यंत देशातील वर्णद्वेष पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवणार,''असेही त्या निवेदनात म्हटले गेले आहे.
NBAमधील दिग्गज खेळाडू जॉर्डन याची संपत्ती जवळपास 1,58,68,54,50,000 इतकी आहे.
विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'
समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी
Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!