नियुक्तीच्या विरोधात बत्रा यांचा राजीनामा
By admin | Published: December 31, 2016 02:04 AM2016-12-31T02:04:12+5:302016-12-31T02:04:12+5:30
भ्रटाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांना भारतीय आॅलिम्पिक महासंघ (आयओए)चे आजीवन अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाच्या
नवी दिल्ली : भ्रटाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांना भारतीय आॅलिम्पिक महासंघ (आयओए)चे आजीवन अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाच्या विरोधात जेष्ठ क्रीडा प्रशासक नरेंद्र बत्रा यांनी आयओएचे उपाध्यक्षपद सोडले आहे. एफआयएचचे अध्यक्ष बत्रा यांनी सांगितले की, कलमाडी आणि चौटाला यांच्या मागील दाराने प्रवेश करण्याच्या प्रयत्नाला आपला तीव्र विरोध राहिल. बत्रा हे नुकतेच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत. आयओएचे अध्यक्ष एन रामचंद्रन आणि सरचिटणीस राजीव मेहता यांना लिहलेल्या पत्रात या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेताना बत्रा यांनी म्हंटले आहे की, कोणत्याही सदस्याला या निवडीबद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सात दिवस अगोदर सूचित करण्यात आले नव्हते. ‘या बैठकीत दोघांना आजीवन अध्यक्ष नियुक्त करण्याच्या निर्णयाला माझा विरोध नोंदवित आहे.’ यावेळी आयओएच्या शिफारशीचा स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीचे मी आभार मानतो, असे बत्रा
यांनी कलमाडी यांचे नाव न घेता सांगितले.
आयओएची बैठक होवून तीन दिवस लोटले असूनही आजीवन अध्यक्षपदावरील नियुक्ती अद्याप मागे घेतलेली नाही. याचा निषेध आणि विरोध म्हणून मी आयओएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. -नरेंद्र बत्रा