फलंदाजांची खराब कामगिरी
By Admin | Published: May 13, 2015 11:22 PM2015-05-13T23:22:26+5:302015-05-13T23:22:26+5:30
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इंडियन प्रिमीयर लीगमध्ये मंगळवारी येथे झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुच्या ६ विकेटने
रायपूर : चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इंडियन प्रिमीयर लीगमध्ये मंगळवारी येथे झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुच्या ६ विकेटने झालेल्या पराभवास फलंदाजांना दोषी ठरवले आहे. तसेच संघ पुरेशा धावा करून शकल्याचेही तो म्हणाला.
झहीर खान (९ धावांत २ गडी) आणि अॅल्बी मॉर्कल (२१ धावांत २ बळी) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर सुपरकिंग्ज संघाला ११९ धावांवर रोखल्यानंतर डेअरडेव्हिल्सने सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर (नाबाद ७० धावा)च्या बळावर १६.४ षटकांत ४ गडी गमावत १२० धावा करून सहज विजय नोंदवला.
सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘‘आमची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या ६ षटकांत आम्ही २० धावाही करूशकलो नाही आणि त्यानंतर मार्ग आणखीनच खडतर झाला. तथापि, आम्ही पुरेशा धावाही करू शकलो नाही. आम्ही सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघांचे बळी लवकर घेतले. त्याचबरोबर झेलही सोडले.’’
सामन्याआधी सरावाची संधी मिळाली नसल्याचेही धोनीने सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही सरावसत्राचे आयोजन करू शकलो नाही. ते आधी येथे खेळत होते आणि त्यांना येथे कोणत्या दिशा आणि टप्प्याने गोलंदाजी करायला हवी हे माहीत होते.’
धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला सकारात्मक बाजू घेऊन पुढे जावे लागेल. गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांत जागा मिळवणे महत्त्वपूर्ण आहे. कदाचित आम्ही मायकल हसीला प्ले आॅफआधी संधी देऊ.’ दुसरीकडे डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनी याने आपल्या संघाची प्रशंसा केली.
ड्युमिनी म्हणाला, ‘विजयानंतर चांगले वाटत आहे. आम्ही या सत्रात चांगले पुनरागमन केले. मी पॉवर प्लेमध्ये जितकी गोलंदाजी पाहिली त्यात आजची आमची कामगिरी सर्वोत्तम होती.’ संघातील खेळाडूंचीही ड्युमिनीने स्तुती केली. ड्युमिनी म्हणाला, ‘शाहबाज नदीमने चांगली गोलंदाजी केली. आम्ही पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि
त्यामुळे आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.’ (वृत्तसंस्था)