फलंदाजांनी संयम दाखवायला हवा
By admin | Published: January 28, 2016 01:45 AM2016-01-28T01:45:00+5:302016-01-28T01:45:00+5:30
भारताविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ३७ धावांच्या पराभवानंतरही आॅस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने डावादरम्यान फलंदाजांनी संयमाने फलंदाजी करायला हवी होती
अॅडिलेट : भारताविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ३७ धावांच्या पराभवानंतरही आॅस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने डावादरम्यान फलंदाजांनी संयमाने फलंदाजी करायला हवी होती, असे मत व्यक्त केले.
भारताविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात १७ धावांवर बाद होणारा वॉर्नर म्हणाला, ‘‘निश्चितच भारतीय गोलंदाजांनी येथे चांगली गोलंदाजी केली; परंतु आम्ही अकारण मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्या आणि याच क्षेत्रात संघाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.’’
तो म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियाचे मैदान अपेक्षेनुसार मोठे असून येथे तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी खराब चेंडूंची प्रतीक्षा करावी लागते. आम्ही संयमाने फलंदाजी करायला हवी होती; परंतु आम्ही अनावश्यक विकेट गमावल्या. आम्ही मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झालो; परंतु भारतातील छोट्या मैदानात हे मोठे फटके निर्णायक असतील.