फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

By admin | Published: March 19, 2016 01:58 AM2016-03-19T01:58:52+5:302016-03-19T01:58:52+5:30

कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले

Batting will be the deciding factor! | फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

Next

- सौरव गांगुली लिहितो़...

कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले असतील. क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींचा मिनिटा मिनिटाला मिळणारा आनंद फार मोठा असतो. क्रिकेटपटू या नात्याने मी भारत-पाक लढतीचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलो. आता आयोजक या नात्याने नवी जबाबदारी आव्हानात्मक आहे.
पहिला सामना भारताने गमविल्यामुळे चाहते फारच दडपणात आहेत; पण एक सांगू का, दडपणातून मार्ग काढणारा आणि मुसंडी मारणारा जर कुठला संघ असेल तर तो भारतच आहे. ११ पैकी १० सामने भारताने सलग जिंकले हे विसरू शकत नाही.
ईडनची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. अनेक भारतीय खेळाडू या खेळपट्टीवर मोठी खेळी करू शकतील, अशी अपेक्षा करता येईल. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने ती वेगवान माऱ्यालादेखील मदत करेल पण फिरकी गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा अचूक ठेवल्यास फलंदाजांना ते त्रस्त करू शकतील. मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे. क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू निसटल्यास तो थेट सीमारेषेवरच जाऊन विसावतो. खेळपट्टीचे स्वरूप संपूर्ण ४० षटके एकसारखे राहणार असल्याने नाणेफेक कुणीही जिंको फारसा फरक पडणार नाही.
ईडनवर पाकने बांगलादेशला नमविल्याने त्यांचे पारडे या सामन्यात किंचित जड आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की भारताविरुद्ध त्यांची बाजू भक्कम ठरावी. शनिवारचा दिवस नवा असेल आणि एका बलाढ्य फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत. पाकची गोलंदाजी धारदार आहे, पण फलंदाजी मात्र चिंतेचा विषय राहीलच. या सामन्यात फलंदाजी हीच दोन्ही संघांसाठी निर्णायक बाब ठरेल, असे माझे मत आहे.
दोन्ही संघ आजच्या लढतीसाठी फारसे बदल करतील असे वाटत नाही. भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला संघ कायम ठेवेल. बांगलादेशवर विजय मिळविणाऱ्या पाक संघात चांगला समन्वय होता. यात अधिक बदलाची आणि प्रयोगाची गरज असेल असे वाटत नाही. भारत-पाक सामना हा धर्मयुद्धासारखा असतो. सामन्यादरम्यान अनेकांचा श्वास रोखला जावा, अशा घटना घडतात. चाहत्यांच्या प्रतिसादामुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचा संचार होतो. या लढतीत राष्ट्रीयत्व हा देखील प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कुणाविरुद्धही हरलात तरी चालेल, पण पाककडून पराभव नको अशी चाहत्यांची
भावना असते. ईडनवर सामना
असेल तर ६६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचे दडपणही यजमान संघावर असेलच. ईडनवरील पाकच्या विजयाची फारच चर्चा रंगली
आहे. येथे पाक संघ भारताविरुद्ध एकाही सामन्यात हरलेला नाही;
पण येथे हेदेखील ध्यानात घ्यायला हवे की भारताने विश्वचषकात पाकविरुद्ध एकही सामना गमविलेला नाही. (गेमप्लान)

Web Title: Batting will be the deciding factor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.