मुंबई-बँगलोरची अस्तित्वाची लढाई

By admin | Published: May 11, 2016 02:46 AM2016-05-11T02:46:25+5:302016-05-11T02:46:25+5:30

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांसाठी विजय मिळविणे अत्यावश्यक बनले आहे.

The battle for the existence of Mumbai-Bangalore | मुंबई-बँगलोरची अस्तित्वाची लढाई

मुंबई-बँगलोरची अस्तित्वाची लढाई

Next

विश्वास चरणकर, बंगळुरू
आयपीएलची लढाई आता अखेरच्या टप्प्यावर आल्याने प्रत्येक संघाला एकेक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांसाठी विजय मिळविणे अत्यावश्यक बनले आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास आरसीबीचे आव्हान टिकून राहील, तर अंतिम चार संघांत पोहोचण्याच्या दृष्टीने विजयामुळे मुंबईची वाट सुकर होईल.
दोन्ही संघांचे प्रत्येकी ९ सामने झाले असून मुंबई १०, तर आरसीबी ८ गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. आजचा सामना मुंबईने जिंकला तर ते चौथ्या स्थानावर जातील, आरसीबीने जिंकल्यास त्यांना पाचव्या स्थानावर जाण्याची संधी असेल.
मुंबईला सध्या सलामीचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा हे दोघे आलटून-पालटून यशस्वी ठरत असले, तरी संघाला ओपनिंग पार्टनरशिप लाभत नाही, त्याचा मोठा तोटा होत आहे. आघाडीची फळी ढेपाळली, तर मधली फळी डाव सावरताना दिसत नाही. मधल्या फळीत पोलार्डची फलंदाजी केकेआरविरुद्धचा अपवाद वगळता फारशी बहरलेली नाही.
गोलंदाजीत मॅक्लेनघन, बुमराह, हरभजनसिंग यांची कामगिरी चांगली होत आहे. टीम साउदीची गोलंदाजीही चांगली होत असली तरी फलंदाजीस बळकटी यावी, म्हणून त्याच्या जागी कोरी अँडरसनचा संघात समावेश होऊ शकतो. अतिरथी महारथींचा भरणा असलेला आरसीबी संघही यंदा पराभवाच्या फेऱ्यात अडकला आहे. गेलसारख्या दिग्गज खेळाडूला फॉर्मात नसल्यामुळे वगळावे लागले आहे. गोलंदाजीत शेन वॉटसन वगळता एकही नाव अव्वल दर्जाचे नसल्याने डेथ ओव्हर्समध्ये संघाला दणका बसत आहे.
>उभय संघ यातून निवडणार
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स, मिचेल स्टार्क, डेव्हिड विस, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरॉन, केदार जाधव, मनदीपसिंग, मॅडम मिल्ने, सर्फराझ खान, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, अबू नेचिम, सचिन बेबी, यजुवेंद्र चहल, सॅम्युअल बद्री, प्रवीण दुबे, इक्बाल अब्दुल्ला, विक्रमजित मलिक, अ‍ॅडम मिलन, परवेझ रसूल, लोकेश राहुल, विकास टोकस व केन रिचर्डसन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.

Web Title: The battle for the existence of Mumbai-Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.