नरसिंगची लढाई शेवटपर्यंत लढणार

By admin | Published: August 18, 2016 01:21 AM2016-08-18T01:21:50+5:302016-08-18T01:21:50+5:30

भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्याला जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे. कुस्ती महासंघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

The battle of Narasimha will be fought till the end | नरसिंगची लढाई शेवटपर्यंत लढणार

नरसिंगची लढाई शेवटपर्यंत लढणार

Next

रिओ : भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्याला जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे. कुस्ती महासंघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी ‘लोकमतला’ सांगितले.
मंगळवारी रात्री उशिरा गेम्स व्हिलेजमध्ये ब्रिजभूषण यांना नरसिंगच्या वाटचालीबद्दल विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, नाडाने जो अहवाल वाडाकडे पाठवायला हवा होता तो पाठविला नव्हता. त्यामुळे वाडाकडून निर्णय येण्यास उशीर झाला. वाडाची सुनावणी आज गुरुवारी होणार आहे. त्याच दिवशी नरसिंगचा निर्णय होईल. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची तयारी पूर्ण झाली. दिल्लीतील आमचे वकील जरी येथे येऊ शकले नसले तरी आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी येथील एक वकिलाची नेमणूक केली आहे. गरज भासल्यास दिल्लीतील आमचे वकील नाडा समिती समोर कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा मोबाईलवर बाजू मांडतील. आम्ही आयओसीलासुध्दा नरसिंगबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती करणार आहोत.’
आॅलिम्पिक सुरू होण्यापूर्वी आयओसीच्या बैठकीत रशियाच्या खेळाडूंबाबत जो निर्णय घेतला, तोच निर्णय नरसिंगच्याबाबत घ्यावा, अशी विनंती आयओसीला करणार आहोत, असे सांगून ब्रिजभूषण पुढे म्हणाले,‘ नरसिंगला स्पर्धेत सहभागी होऊ द्यायचे नसते तर आयओसीने त्याचे ओळखपत्र, त्याची गेम्स व्हिलेजमध्ये संघाबरोबर राहण्याची व्यवस्था, लॉटस्मध्ये त्याच्या नावाचा समावेश केलाच नसता. नरसिंगची बाजू मांडण्यासाठी आम्ही कोणतीच कसर शिल्लक ठेवणार नाही. त्याला योग्य न्याय मिळेल,असा मला विश्वास आहे. निर्णय आमच्या बाजूनेच लागेल, नरसिंह या स्पर्धेत खेळेल आणि भारताला नक्कीच पदक जिंकून देईन, असा विश्वास आहे.’ ‘भगवान के घर देर है, अंधेर नही’ असेही ब्रिजभूषण सांगायला विसरले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The battle of Narasimha will be fought till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.