मुंबई-कोलकाता यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

By admin | Published: May 13, 2017 02:02 AM2017-05-13T02:02:02+5:302017-05-13T02:02:02+5:30

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघात आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये होणाऱ्या लढतीद्वारे पहिल्या दोन स्थानांसाठी

Battle of Varchaswa between Mumbai and Kolkata today | मुंबई-कोलकाता यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

मुंबई-कोलकाता यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

Next

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघात आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये होणाऱ्या लढतीद्वारे पहिल्या दोन स्थानांसाठी फैसला होईल. शानदार सुरुवातीनंतर दोन्ही संघ विजयी पथावरून भटकले आहेत. मुंबईला सलग दोन सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले, तर केकेआर संघ तीन सामन्यात पराभूत झाला.
प्ले आॅफ गाठणारा पहिला संघ मुंबईवर या सामन्यातील निकालाचा फारसा फरक पडणार नाही, पण केकेआर हा सामना जिंकून १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्यासाठी धडपडत आहे. सध्या मुंबईचे १८ तर केकेआरचे १६ गुण आहेत. पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांना फायनलसाठी दोन संधी मिळतील.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील निकालांवर नजर टाकल्यास मुंबईने केकेआरला आतापर्यंत सलग चार वेळा नमविले. दोन्ही संघाचा जयपराजयाचा रेकॉर्ड ४-१४ असा आहे. ज्या संघांनी अद्याप बाद फेरी गाठलेली नाही त्यात सर्वात प्रभावी धाव सरासरी (प्लस ०.७२९) केकेआरची आहे. पण अखेरपर्यंत न ताणता लवकर पात्रता गाठण्याची केकेआरला घाई झाली आहे. केकेआरला विजय मिळवायचा झाल्यास आघाडीच्या फलंदाजांवर विसंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल.
केकेआरची गोलंदाजी भक्कम असल्याने ही लढत मुंबईचे फलंदाज विरुद्ध केकेआरचे गोलंदाज अशी असेल. मुंबईचा कॅरेबियन स्टार लेंडल सिमन्स आणि किरोन पोलार्ड शानदार फॉर्ममध्ये आहेत. मागच्यावेळी मुंबईने केकेआरला दोन्ही सामन्यात पराभूत केले होते. दोन्ही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. रोहितपुढे उद्या स्थिरावून खेळण्याचे आव्हान असेल. पंजाबविरुध्दचा पराभव मागे टाकून मुंबई उद्या मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)
आम्हाला घाबरण्याची
गरज नाही : पोलार्ड
प्ले आॅफमध्ये स्थान निश्चितीनंतर आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले तरी घाबरण्याची गरज नाही, असे या संघाचा फलंदाज विंडीजचा किरोन पोलार्ड याने म्हटले आहे.
मुंबई संघ पंजाबकडून सात धावांनी पराभूत झाल्यानंतर पोलार्ड म्हणाला, ‘या पराभवामुळे आम्ही देखील माणसे आहोत आणि प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, हे सिद्ध झाले. कामगिरीत सुधारणेची आम्हाला देखील गरज आहे.
हैदराबादविरुद्ध खराब कामगिरी केली पण येथील चांगल्या विकेटवर आम्ही पंजाबविरुद्ध चांगला खेळ केला. चांगल्या संघांविरुद्धची लढत प्रत्येकवेळी जिंकू असे नाही. आमचे मनोबल कायम असल्याने प्ले आॅफमध्ये भीती बाळगण्याचे कारण
नाही.
पात्रता फेरी हे पहिले लक्ष्य असते. ते आम्ही गाठले. ज्या चुका झाल्या त्या सुधारून पुढील सामन्यात विजय
मिळवू.’

Web Title: Battle of Varchaswa between Mumbai and Kolkata today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.