लॉर्ड्सवर फलंदाजीसाठी सज्ज!

By admin | Published: July 16, 2014 02:37 AM2014-07-16T02:37:09+5:302014-07-16T16:30:59+5:30

थंड आणि शांत अशा नॉटिंगहॅम शहरातून भारताचा संघ गजबजलेल्या लंडन शहरात आला. आक्रमक आणि चैतन्यदायी मूडशी समरस होत भारतीय संघाचे सोमवारी येथे आगमन झाले.

Battling at Lord's! | लॉर्ड्सवर फलंदाजीसाठी सज्ज!

लॉर्ड्सवर फलंदाजीसाठी सज्ज!

Next

अजय नायडू, लंडन
थंड आणि शांत अशा नॉटिंगहॅम शहरातून भारताचा संघ गजबजलेल्या लंडन शहरात आला. आक्रमक आणि चैतन्यदायी मूडशी समरस होत भारतीय संघाचे सोमवारी येथे आगमन झाले. संध्याकाळी युवराज सिंगच्या उपस्थितीत हॉटेल हिल्टन येथे विशेष प्रीतिभोजनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता संघाने सराव केला. संघातील एका खेळाडूवर अनेकांचे लक्ष आहे. तो म्हणजे विराट कोहली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडूनही त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कारण विराटचा हा पहिलाच इंग्लंड कसोटी दौरा आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या गुरूवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. 
नेटमध्ये काही ‘हिट्स’ लगावल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. मी लॉर्ड्सवर उतरण्यासाठी सज्ज आहे, असे विराट हसतमुखाने म्हणाला. लॉर्ड्सवरील इतिहास आणि परंपरेत प्रत्येक क्रिकेटर हरवलेला असतो. ही गोष्ट विराटसाठीसुद्धा लागू होते. कारण त्याचा हा इंग्लंडमधील पहिला कसोटी दौरा आहे. लॉर्ड्सवर खेळण्यासाठी मी उत्साही आहे. येथे खेळण्याबाबतचे काही ध्येय माझ्या मनात आहेत. एक क्रिकेटपटू म्हणून आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड येथे शतक झळकाविणे प्रत्येकासाठी अभिमानाचे असते. या यादीत इंग्लंडलासुद्धा अधिक प्राधान्य आहे.
आपल्या तडफदार स्ट्रेक्स आणि शैलीने युवा फलंदाज विराटने क्रिकेटविश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे. २७ वर्षीय विराटने २५ आंतरराष्ट्रीय शतके झळकाविली असून, त्यात सहा कसोटी शतकांचा समावेश आहे.

 

 

Web Title: Battling at Lord's!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.