बीसीसीआय कोहलीच्या पाठीशी

By admin | Published: March 9, 2017 01:34 AM2017-03-09T01:34:49+5:302017-03-09T01:34:49+5:30

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डीआरएसच्या निर्णयावर

BCCI to be behind Kohli | बीसीसीआय कोहलीच्या पाठीशी

बीसीसीआय कोहलीच्या पाठीशी

Next

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे पाहून संकेत स्वीकारले ही त्याची चूक होती की काय, याची शहानिशा करण्यासाठी चौकशी नियुक्त करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्मिथवरील खोटारडेपणाचे आरोप फेटाळल्यानंतर बीसीसीआयने कोहलीच्या समर्थनार्थ वादात उडी घेतली आहे. बीसीसीआयच्या मते, या सर्व प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर टीम इंडिया आणि कर्णधार कोहली यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विराट परिपक्व आणि अनुभवी खेळाडू आहे. मैदानावर त्याची वागणूक फारच आक्रमक असते. आयसीसी एलिट पंच नायजेल लोंग यांनीदेखील मैदानावरील कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांनीच स्टीव्ह स्मिथ याला ड्रेसिंग रूमकडून इशारा घेण्यापासून रोखले.’ आयसीसीने या प्रकरणाचा तपास करावा आणि दोषींवर कारवाई करावी, असे बीसीसीआयला वाटते. उर्वरित दोन्ही कसोटी सामने खेळ भावनेने खेळले जातील, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली.
स्टीव्ह स्मिथने पत्रकारांसोबत बोलताना ती माझी घोडचूक होती, असे कबूल केले आहे. आयसीसीने या प्रकरणाची शहानिशा करायला हवी. पुढील दोन सामने खेळभावनेने खेळू, अशी ग्वाहीदेखील स्मिथने दिल्याचे बीसीसीआयने वक्तव्यात नमूद केले. (वृत्तसंस्था)

Web Title: BCCI to be behind Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.