शमीला बीसीसीआयने दिली दोन कोटींची नुकसानभरपाई
By admin | Published: July 11, 2016 08:36 PM2016-07-11T20:36:23+5:302016-07-11T20:36:23+5:30
आयपीएलच्या आठव्या सत्रास मुकलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बीसीसीआयने २ कोटी २३ लाख १२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे झालेल्या वन डे क्रिकेट विश्वचषकानंतर गुडघ्याच्या जखमेमुळे आयपीएलच्या आठव्या सत्रास मुकलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बीसीसीआयने २ कोटी २३ लाख १२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. गुडघ्याच्या जखमेमुळे शमी आयपीएल-८मध्ये खेळू शकला नव्हता. त्याआधी दुखणे असताना देखील त्याने वन डे विश्वचषकात भाग घेतला होता. आयपीएलमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्याला ही रक्कम देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने वेबसाईटवर म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने विश्व चषकात टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने पाच सामन्यात १७ गडी बाद करीत पाचवा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा मान पटकविला. शमीने गुडघ्यावर श्स्त्रक्रिया करून घेतली. भारताने यंदा सुरुवातीला आॅस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा देखील शमीच्या पायाचे स्रायू ताणले गेले होते. त्यामुळे आशिया चषक आणि टी-२० चॅम्पियनशिपमध्येही तो खेळू शकला नाही. विंडीज दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील कसोटी संघात शमीला स्थान देण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)