बीसीसीआयला कायदेशीर नोटीस पाठविणार : नासीर
By admin | Published: April 29, 2017 12:49 AM2017-04-29T00:49:32+5:302017-04-29T00:49:32+5:30
दोन देशांदरम्यान होणाऱ्या मालिकेत भारताने खेळण्यास नकार दिल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून
कराची : दोन देशांदरम्यान होणाऱ्या मालिकेत भारताने खेळण्यास नकार दिल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळास कायदेशीर नोटीस पाठविणार आहे.
पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मंडळाचे कायदेशीर सल्लागार सलमान नासीर यांनी कायदेशीर लढाईसाठी नुकताच लंडनचा दौरा केला. नुकसानीचा दावा करण्याच्या दृष्टीने ते गेले होते. बीसीसीआयला कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात यापूर्वीच सांगण्यात आले आहे.
दोन देशांदरम्यानच्या स्पर्धेतून पाकिस्तानला मिळणाऱ्या रकमेची यामुळे भरपाई होणार आहे. बीसीसीआयला पाकिस्तानविरूद्ध खेळण्यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळत नसेल तर ही पीसीबीची समस्या नाही. आयसीसी स्वतंत्र यंत्रणा आहे. एकमेकांसोबतच्या कराराचा दोन्ही देशांनी सन्मान केला पाहिजे.