बीसीसीआयकडून क्रिकेटमधील पांडवांचा सत्कार, द्रविड अनुपस्थित

By admin | Published: April 6, 2017 12:21 PM2017-04-06T12:21:34+5:302017-04-06T12:27:52+5:30

हैदराबादच्या उदघाटन सोहळ्याच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या दिग्गज भारतीय क्रिकेटवीरांचा सन्मान करण्यात आला

BCCI ponders Pandavas felicitate, Dravid absent | बीसीसीआयकडून क्रिकेटमधील पांडवांचा सत्कार, द्रविड अनुपस्थित

बीसीसीआयकडून क्रिकेटमधील पांडवांचा सत्कार, द्रविड अनुपस्थित

Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 6 - इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. सनराईजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव करत विजयी सलामी दिली आहे. मात्र सलामीच्या या सामन्याआधी मोठ्या दिमाखात आयपीलच्या 10 व्या पर्वांचं उद्घाटन करण्यात आला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी विराट कोहलीसह आयपीएलच्या आठही संघांचे कर्णधार स्टेडियममध्ये अवतरले होते. यावेळी अभिनेत्री अॅमी जॅक्सनने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 
 
मात्र यावेळी सर्वाचं लक्ष होतं ते म्हणजे एकेकाळी भारतीय क्रिकेट संघातील पांडव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्याकडे. कारण उदघाटन सोहळ्याच्यानिमित्तानं या दिग्गज भारतीय क्रिकेटवीरांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र यावेळी मिस्टर डिपेंडेबल राहुल द्रविड दिसत नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
 
ठरल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांचा सन्मान करण्यात आला. मात्र दिल्लीमध्ये आलेल्या वादळामुळे राहुल द्रविड पोहचू शकला नसल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत वादळ आल्याने विमानांचं उड्डाण उशिराने सुरु होतं, तसंच हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमदेखील विमानतळापासून दोन तासांच्या अंतरावर असल्याने द्रविडला उपस्थित राहणं शक्य झालं नाही.
 
आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले होते की,‘भारतीय क्रिकेटमधील पाच दिग्गज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांचा ५ एप्रिल रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या उद्घाटन समारंभादरम्यान सत्कार करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.’
 
या पाच खेळाडूंपैकी चार खेळाडूंनी भारताचे कर्णधारपद भूषविले आहे. माजी कर्णधार व सध्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे यांचा सत्कार करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश का करण्यात आला नाही, याचे कारण अद्याप कळले नाही. भारतीय क्रिकेटच्या स्वर्णिम युगामध्ये या पाच दिग्गजांसह कुंबळे यांचेही योगदान मोलाचे ठरले आहे. 
 

Web Title: BCCI ponders Pandavas felicitate, Dravid absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.