बीसीसीआय टक्कर देण्यास सज्ज

By admin | Published: October 16, 2016 02:52 AM2016-10-16T02:52:36+5:302016-10-16T02:52:36+5:30

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि लोढा समिती यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता असून, उच्च न्यायालयासमोर सोमवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी

BCCI ready to fight | बीसीसीआय टक्कर देण्यास सज्ज

बीसीसीआय टक्कर देण्यास सज्ज

Next

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि लोढा समिती यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता असून, उच्च न्यायालयासमोर सोमवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी आज (शनिवारी) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत जस्टिस लोढा समितीच्या काही शिफारशींना विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आजच्या बैठकीत लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींबाबत विचार विनिमय केला. त्यावर खूप चर्चासुद्धा झाली. शेवटी असे समोर आले की, लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी स्वीकारने व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. आमचे वकील कपिल सिब्बल आपला विरोध कायम ठेवतील. एक राज्य, एक व्होट, एक व्यक्ती एक पद, ब्रेकचा अवधी हे मुद्दे गुंतागुंतीचे आहेत. लोढा समितीच्या शिफारशींचा स्वीकार करणाऱ्या संघटनांमध्ये फक्त त्रिपुरा, विदर्भ आणि राजस्थान या क्रीडा संघटना आहेत. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रातील मुद्यांवरसुद्धा चर्चा झाली. सोमवारी होणाऱ्या सुनावणीत जगातील सर्वांत श्रीमंत असलेल्या क्रिकेट बोर्डासाठी आपले म्हणणे मांडण्याची शेवटची संधी असेल.
(वृत्तसंस्था)

Web Title: BCCI ready to fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.