बीसीसीआय एजीएमबाबतचा निर्णय ८ फेब्रुवारीला घेणार
By admin | Published: February 4, 2015 01:49 AM2015-02-04T01:49:23+5:302015-02-04T01:49:23+5:30
बीसीसीआय कार्यकारिणीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार असून, त्यात वार्षिक आमसभेची (एजीएम) तारीख निश्चित होईल.
नवी दिल्ली : बीसीसीआय कार्यकारिणीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार असून, त्यात वार्षिक आमसभेची (एजीएम) तारीख निश्चित होईल. याव्यतिरिक्त निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या भविष्यातील रणनीतीबाबत माहिती स्पष्ट होईल.
कार्यकारी समितीचे सदस्य ७ फेब्रुवारी रोजी चेन्नईत एकत्र येणार आहेत. त्या वेळी श्रीनिवासन काही सदस्यांसोबत अनौपचारिक चर्चा करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे एक सिनिअर पदाधिकारी म्हणाले, ‘‘आम्हाला कार्यकारी समितीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची नोटीस मिळाली आहे. त्यामुळे चन्नईत ५ फेब्रुवारी रोजी होणारी सदस्यांची अनौपचारिक बैठक आता होणार नाही. श्रीनिवासन हे बैठकीपूर्वी ७ फेब्रुवारी रोजी कार्यकारी समितीमध्ये समावेश असलेल्या काही मोजक्या संलग्न संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
(वृत्तसंस्था)