..तर बीसीसीआयला आयपीएल कार्यक्रम बदलावा लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2016 12:15 AM2016-01-07T00:15:56+5:302016-01-07T00:15:56+5:30
जर सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी मानण्यासाठी बीसीसीआयला भाग पाडले, तर बीसीसीआयला एप्रिलपासून
नवी दिल्ली : जर सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी मानण्यासाठी बीसीसीआयला भाग पाडले, तर बीसीसीआयला एप्रिलपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करावा लागेल. समितीच्या एका शिफारशीनुसार आयपीएल सत्र आणि राष्ट्रीय कॅलेंडर यांच्यात १५ दिवसांचे अंतर असायला हवे.
भारतीय क्रिकेट संघ आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेत सहभागी होणार आहे. जी स्पर्धा १४ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान खेळविण्यात येईल. जर भारतीय संघाने फायनलसाठी ‘क्वालिफाय’ केले, तर देशातील अव्वल क्रिकेटपटूंना ही
स्पर्धा संपण्याच्या एका आठवड्यापूर्वी आयपीएल स्पर्धेत खेळावे लागेल. (वृत्तसंस्था)