सावधगिरी बाळगावी लागेल

By admin | Published: March 12, 2017 03:11 AM2017-03-12T03:11:43+5:302017-03-12T03:11:43+5:30

आश्विनच्या गोलंदाजीवर फटके खेळणे म्हणजे जोखीम पत्करणे असले तरी त्याच्याविरुद्ध फटके खेळणे थांबविणार नाही, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड

Be cautious | सावधगिरी बाळगावी लागेल

सावधगिरी बाळगावी लागेल

Next

बंगळुरू : आश्विनच्या गोलंदाजीवर फटके खेळणे म्हणजे जोखीम पत्करणे असले तरी त्याच्याविरुद्ध फटके खेळणे थांबविणार नाही, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आश्विनने वॉर्नरला तीन वेळा बाद केले आहे.
वॉर्नर म्हणाला, ‘‘आश्विनने मला आतापर्यंत नऊ वेळा बाद केले आहे. त्यामुळे त्याचे त्याला श्रेय द्यायलाच हवे.’’
आश्विनने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात वॉर्नरला बोल्ड केले, तर दुसऱ्या डावात त्याला पायचित केले.
वॉर्नर म्हणाला, ‘‘गेल्या कसोटी सामन्यात स्विच हिट मारण्याचा प्रयत्न करीत होतो. मी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. असमतोल उसळी माझ्यासाठी चिंतेचा विषय होता. ते नेहमीच आव्हानात्मक असते.’’
आश्विनची लय भंग करण्यासाठी स्विच हिटचा वापर करता येईल. पण, भारतीय खेळपट्ट्यांवर हा फटका खेळताना जोखीम असेल, असेही वॉर्नर म्हणाला. (वृत्तसंस्था)

स्लेजिंगला प्रत्युत्तर देणे बंद केले असल्याचा दावा वॉर्नरने केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू कुरतडल्याचा आरोप झाल्यानंतर दंडाच्या शिक्षेला सामोरे जाणारा वॉर्नर म्हणाला, ‘‘स्लेजिंगला उत्तर देण्याची गरज भासत नाही.’’
मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) अलीकडे बॅटच्या आकाराबाबत मर्यादा निश्चित केली आहे. पण या बदलाचा मोठा फरक पडणार नसल्याचे वॉर्नरचे मत आहे.
वॉर्नर म्हणाला, ‘‘या बदलाबाबत ताळमेळ साधावा लागेल. आताही चौकार, षटकार
लगावले जातीलच. चेंडू तेवढ्याच दूर जाईल. एकेरी, दुहेरी धावा पळणे सुरूच राहील. बॅटची कड
घेऊन चेंडू सीमारेषा ओलांडणार नाही, हे घडण्याची शक्यता आहे.’’
दुखापतग्रस्त मिशेल स्टार्कच्या अनुपस्थितीत पॅट कमिन्स संघासाठी उपयुक्त योगदान देईल, असा विश्वास वॉर्नरने या वेळी व्यक्त केला.

स्विच हिट लगावताना चूक झाली तर पायचित होण्याची शक्यता अधिक असते. पण रिव्हर्स स्वीप करताना असे घडण्याची शक्यता नसते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आश्विनच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केली तर त्याला काही बदल करावे लागतील. तो चांगला गोलंदाज आहे. मायदेशात त्याने खोऱ्याने बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध रणनीती आखावी लागेल. -डेव्हिड वॉर्नर

जखमी स्टार्कची जागा कमिन्स घेणार
रांची : वेगवान गोलंदाज पॅट्रिक कमिन्स हा भारताविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया संघात जखमी मिशेल स्टार्कचे स्थान घेणार आहे. स्टार्कच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो मालिकेबाहेर पडला आहे.
कमिन्सने कारकिर्दीत केवळ एकच कसोटी खेळली. २०११ मध्ये त्याने द. आफ्रिकेविरुद्ध सात गडी बाद केले होते. राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य ट्रॅव्हर होन्स म्हणाले, ‘‘मिशेलचे संघाबाहेर पडणे वेदनादायी आहे. गोलंदाजीत संतुलितपणा आणण्यासाठी आम्ही कमिन्सची निवड केली. तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होत आहे.

Web Title: Be cautious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.