विराटला मागे टाकत हा खेळाडू बनला भारताचा अव्वल फलंदाज
By admin | Published: March 21, 2017 08:39 PM2017-03-21T20:39:33+5:302017-03-21T20:39:33+5:30
नुकत्याच जाहिर झालेल्या आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 941 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रांचीतील तिसऱ्या कसोटीत पुजाराने मैदानात टीच्चून फलंदाजी करत 525 चेंडूंचा सामना करत 202 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. त्याच्या या खेळीचा फायदा त्याला नुकाताच आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिगमध्ये झाला आहे. तिन्ही प्रकारच्या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंमध्ये रणमशिन विराट कोहली अव्वल असतो पण आयसीसीच्या नव्या रँकिममध्ये भारताच्या पुजाराने त्याला मागे टाकत भारतीय खेळाडूत अव्वल स्थान पटकावले आहे. विराट कोहली चौथ्या तर पुजारा दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत पुजाराने गाठलेलं सर्वोच्च स्थान आहे.
नव्या आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 941 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर पुजाराने 861 गुण मिळवत दुसरे स्थान गाठले आहे. पुजाराने इंग्लंडचा जो रुट (848) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (826) यांना मागे टाकले आहे. रांची कसोटीतील पुजाराच्या द्विशतकामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर समाधानकारक आघाडी घेता आली होती.
गोलंदाजीत जाडेजाची अश्विनवर मात -
जडेजाने आर अश्विनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवींद्र जाडेजाने सात अंक मिळवत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमगध्ये श्रीलंकेचा रंगना हेराथ तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर अमुक्रमे ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवुड आणि इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहेत. रांची कसोटी सामन्याआधी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावे 892 अंक होते. रांची कसोटीत एकीकडे इतर गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करत असताना रवींद्र जडेजाने मात्र आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केलं.