बेन स्टोक्सने विश्वास सार्थ ठरवला

By admin | Published: May 4, 2017 12:42 AM2017-05-04T00:42:05+5:302017-05-04T00:42:05+5:30

गुजरात लायन्सविरुध्द झळकावलेल्या जबरदस्त विजयी शतकाच्या जोरावर बेन स्टोक्सने केवळ रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या प्ले आॅफ फेरी

Ben Stokes believes in faith | बेन स्टोक्सने विश्वास सार्थ ठरवला

बेन स्टोक्सने विश्वास सार्थ ठरवला

Next

- अयाझ मेमन - 
गुजरात लायन्सविरुध्द झळकावलेल्या जबरदस्त विजयी शतकाच्या जोरावर बेन स्टोक्सने केवळ रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या प्ले आॅफ फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या नसून त्याने आपल्या या घणाघाती खेळीने संघाने मोजलेल्या मोठ्या किंमतीला न्याय देखील दिला. तब्बल १४.५ करोड रुपयांची घसघसीत रक्कम देऊन पुणे संघाने स्टोक्सला आपल्या संघात घेतले होते. विशेष म्हणजे यासह तो आयपीएलच्या दहा सत्रातील सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडूही ठरला. त्याचप्रमाणे स्टोक्सला मिळालेली किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्य बातमी तर ठरलीच, शिवाय या खेळाडूवरही प्रचंड दडपण आले.
जेव्हा फ्रेंचाइजी एखाद्या खेळाडूंसाठी मोठी किंमत मोजत असते, तेव्हा त्या फ्रेंचाइजीला त्या किंमतीचा परतावाही अपेक्षित असतो. सध्या विजेतेपद जरी दूर असले तरी आरपीएस संघ मालक मात्र स्टोक्ससाठी मोठी किंमत मोजून कोणतीही चूक केली नसल्याचे सिध्द झाल्याने निश्चिंत असतील. स्टोक्स आधी आयपीएलमध्ये सर्वाधिक किंमत मिळवणारा परदेशी खेळाडू इंग्लंडचाच अँड्रयू फ्लिंटॉफ ठरला होता. पण तो जबरदस्त फ्लॉप ठरला होता आणि बहुतेक सामन्यांना तो दुखापतीमुळे मुकला होता.
त्याचबरोबर आणखी एक स्टार खेळाडू आपल्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला तो म्हणजे इंग्लंडचाच केविन पीटरसन. तो अनेक संघाकडून (बँगलोर, दिल्ली) खेळला पण आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्याचबरोबर अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्यांमध्ये काही भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये आघाडीवर आहेत ते इरफान पठाण आणि पवन नेगी.
इरफानला काहीवर्षांपुर्वी प्रत्येक मोसमासाठी जवळपास १.९ दशलक्ष डॉलर अशी मोठी किंमत मिळत होती. मात्र, यावर्षी त्याला कोणीही आपल्या संघात घेतल नाही. अखेर स्टार अष्टपैलू ड्वेन ब्रावो जखमी झाल्याने त्याच्या जागी इरफानला गुजरात संघाने आपल्या चमूत घेतले. दुसरीकडे नेगीने गेल्या दोन सत्रात जवळपास ८.५ करोड रुपयांची किंमत मिळवून लक्ष वेधले. पण यावेळी मात्र त्याला खूप कमी किंमत मिळाली.
त्याचबरोबर या लीगमध्ये परदेशी खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिध्द करुन मोठी छाप पाडली.
खरं म्हणजे अनेक प्रमुख परदेशी खेळाडूंनी लक्षवेधी खेळ करुन स्वत:ला सिध्द केले आहे. यामध्ये गेल, डिव्हिलियर्स, पोलार्ड, मलिंगा, वॉर्नर यांची नावे आघाडीवर घ्यावी लागतील. त्यांनी आपल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.
स्टोक्सबाबत म्हणायचे झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याने पुण्याला दोन सामने स्वत:च्या ताकदीवर जिंकून दिले. (मुंबईविरुध्द चेंडूने आणि गुजरातविरुध्द फलंदाजीने). यासह त्याने स्वत:तील गुणवत्ता सिध्द केलीच, त्यासह त्याने आपल्यात यशस्वी होण्याची भूक किती मोठी आहे, हे देखील दाखवले. तसेच, या मोसमात कामगिरीतील सातत्य आणि त्याची महत्त्वाकांक्षा यावर स्टोक्सचे यश अवलंबून असेल. शिवाय त्याच्याकडून अशाच कामगिरीची उत्सुकता पुणे संघाला असेल.

Web Title: Ben Stokes believes in faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.