इंग्लंडचा आॅल राऊंडर बेन स्टोक्सला दंड
By admin | Published: October 31, 2016 06:52 PM2016-10-31T18:52:59+5:302016-10-31T18:52:59+5:30
इंग्लंडचा आॅल राऊंडर बेन स्टोक्स याला बांगलादेशविरुद्ध दुस-या कसोटीदरम्यान अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी पंचाचा निर्णय योग्य ठरवित सामना शुल्काच्या १५ टक्के दंड
ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. 31 - इंग्लंडचा आॅल राऊंडर बेन स्टोक्स याला बांगलादेशविरुद्ध दुस-या कसोटीदरम्यान अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी पंचाचा निर्णय योग्य ठरवित सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोकण्यात आला आहे. पंचांच्या निर्णयावर इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याने नाराजी व्यक्त केली. इंग्लंडने हा सामना १०८ धावांनी गमविला. बांगलादेशविरुद्ध हा त्यांचा पहिलाच कसोटी पराभव होता. मालिकेत देखील १-१ अशी बरोबरी झाली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी स्टोक्सची बांगला देशचा फलंदाज शब्बीर रहमान याच्यासोबत बाचाबाची झाली होती. मैदानी पंच कुमार धर्मसेना आणि एस. व्ही. रवी यांनी स्टोक्सला ताकीद देत कर्णधार कूकसोबतही चर्चा केली. खेळाडूंनी मैदानावर पंचांच्या निर्णयाचे पालन केले नाही. आयसीसी नियम २.१.१ नुसार हे खेळभावनेविरुद्ध आहे. स्टोक्सविरुद्ध पंचांनी शेरा नोंदविल्यामुळे आयसीसीने त्याला एक अयोग्य गुण दिला आहे.(वृत्तसंस्था)