मैदानावर भांडणाऱ्या बर्म्युडाच्या खेळाडूवर आजन्म बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2015 11:50 PM2015-09-22T23:50:53+5:302015-09-22T23:50:53+5:30
एका क्लब सामन्यादरम्यान मैदानावर भांडण करणारा बर्म्युडाचा क्रिकेटपटू जेसन अॅण्डरसन याच्यावर आजन्म बंदी लावण्यात आली आहे.
बर्म्युडा : एका क्लब सामन्यादरम्यान मैदानावर भांडण करणारा बर्म्युडाचा क्रिकेटपटू जेसन अॅण्डरसन याच्यावर आजन्म बंदी लावण्यात आली आहे. कौंटी खेळणाऱ्या अॅण्डरसन याने दहा दिवसांआधी सेंट डेव्हिड क्रिकेट क्लब मैदानावर चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स फायनलमध्ये विकेटकिपिंग करतेवेळी फलंदाज जॉर्ज ओब्रायन याच्यावर हल्ला केला होता.
षटक संपताच त्याने ब्रायनला धमकीदेखील दिली. त्यात दोन्ही खेळाडू एकमेकांवर तुटून पडले होते. अॅण्डरसनने फलंदाजाला लाथ हाणली. यावर सहकारी आणि पंचांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविले. अॅण्डरसनवर आजन्म बंदीची, तर ब्रायनवर ५० षटकांच्या सहा सामन्यांतून निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली.(वृत्तसंस्था)