#BestOf2017 : क्यू खेळांमध्ये यावर्षी पंकज अडवाणीचा बोलबाला

By Namdeo.kumbhar | Published: December 25, 2017 07:30 AM2017-12-25T07:30:05+5:302017-12-27T18:32:44+5:30

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना 2017 मध्ये आपल्या खेळाचा जलवा कायम राखल्याचे पहायला मिळाले.

The Best of 2017: Pankaj Advani's role in Q-series this year | #BestOf2017 : क्यू खेळांमध्ये यावर्षी पंकज अडवाणीचा बोलबाला

#BestOf2017 : क्यू खेळांमध्ये यावर्षी पंकज अडवाणीचा बोलबाला

googlenewsNext

मुंबई : भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना 2017 मध्ये आपल्या खेळाचा जलवा कायम राखल्याचे पहायला मिळाले. पंकजनं तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले. गेल्या दहा वर्षामध्ये पंकजनं स्नूकर आणि बिलियर्ड्स या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे. त्यानं यावर्षी एक नवा अध्याय लिहला असे म्हणायला हरकत नाही. साधारणत: खेळाडू स्नूकर आणि बिलियर्ड्स यापैकी एकाचीच निवड करतात. पण पंकजनं दोन्हीत प्रावीण्य मिळवत अनेक विजेतेपदं पटकावत भारताचं नाव रोषण केलं आहे. 

भारतासाठी आणि क्यू खेळासाठी 2016 प्रमाणेच 2017चे वर्ष राहिले आहे. गेल्या काही वर्षापासून पंकज अडवाणीनं क्यू खेळामध्ये भारताचा दबदबा निर्माण केला आहे. पंकजचा हा दबदबा यावर्षीही पहायला मिळाला, त्यानं आपल्या विश्वविजेतेपदामध्ये यावर्षी आणखी एक मानाचा तुरा रोवला. यावर्षी पंकजने 18 वे शानदार विश्व जेतेपद पटकावताना इराणच्या आमिर सरखोश याचे आव्हान परतावले.
2012 पर्यंत पंकज फक्त स्नूकर खेळत असे. बिलियर्ड्सही खेळू शकतो असा विश्वास त्याला वाटला. पंकजचा भाऊ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ श्री तसेच प्रशिक्षक यांच्याशी चर्चा केली आणि दोन्ही खेळ खेळण्याचा निर्णय त्यानं घेतला. दोन्ही खेळ खेळणारे असंख्य खेळाडू आहेत, मात्र दोन्ही खेळांमधील वेळ आणि गुण प्रकारांत एकाच वेळी विश्वविजेतेपद पटकावणारा पंकज एकटाच आहे. दोन्ही खेळांच्या स्पर्धा खेळत असल्याने मेंदू थकण्याऐवजी ताजातवाना होतो. स्पर्धा, सराव यांचे वेळापत्रक जपताना कसरत होते. सतत प्रवास होतो. मात्र काही तरी आव्हानात्मक गोष्ट साध्य केल्याची भावना सुखावणारी असते. असे पंकज सांगतो. 

32 वर्षीय पंकजने 2017 मध्ये अपेक्षानुसार खेळ दाखवला. त्यानं स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही मध्ये यश संपादन केलं. पंकजच्या नावे सध्या 18 विश्वविजेतेपद आहेत. जुलै 2017 मध्ये त्यानं करगीस्थानमध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावले होतं. त्यानं पाकिस्तानी संघाचा 2-0नं दारुण पराभव केला होता. 

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर कसे वाटले असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजनं अतिशय नम्रमपणे उत्तर दिले. तो म्हणाला, माझ्यासाठी सर्व खेळाडू सारखेच आहेत. मग तो पाकिस्तानचा असो किंवा अन्य देशाचा मला काही फरक पडत नाही. माझ फक्त विजयावर लक्ष असते. पाकिस्तान विरोधात सामना असल्यास प्रत्येक खेळाडूवर दबदबा आणि अपेक्षा असतात. मग तो खेळ कोणताही असो. हे आपण नाकारु शकत नाही. अशी परिस्थिती असताना विजय मिळवणे म्हणजे कौतुकास्पदच आहे. स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये मध्ये राष्ट्रीय खिताब जिंकलेला पंकज आडवाणी पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. 

यावर्षी 40 वर्षीय विद्या पिल्लैनं सिंगापूरमध्ये विश्व महिला स्नूर चॅम्पियनशिपमध्ये  रजत पदक जिंकले आहे. हाँगहाँच्या एंग ओन यीनं तिचा पराभव केला होता. मध्यप्रदेशच्या कमल चावला ने विश्व 6 रेड्स स्नूकर चॅम्पियनिशपच्या अंतिम लढतीत धडक मारली होती. पण डेरेन मोर्गननं पराभव करत जेतेपद पटकावलं. नोव्हेंबरमध्ये दोहामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंकजने ८-२ अशी एकतर्फी बाजी मारत आपल्या खात्यात आणखी एका विश्व विजेतेपदाची भर टाकली. बेस्ट ऑफ १५ यानुसार खेळविण्यात आलेल्या या लढतीत सरखोशने पहिला फ्रेम जिंकत अनपेक्षित सुरुवात केली होती. मात्र, यानंतर पंकजने सलग चार फ्रेम जिंकताना ४-१ अशी आघाडी मिळवत आपला हिसका दिला. सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा सरखोशने १३४ गुणांसह बाजी मारत आपली पिछाडी २-४ अशी कमी केली. मात्र, यानंतर जराही एकाग्रता न गमावलेल्या पंकजने जबरदस्त नियंत्रण सादर करताना पुन्हा एकदा सलग चार फ्रेम जिंकत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.

Web Title: The Best of 2017: Pankaj Advani's role in Q-series this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.