दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सर्वोत्तम खेळ व्हावा
By admin | Published: June 11, 2017 12:36 AM2017-06-11T00:36:23+5:302017-06-11T00:36:23+5:30
भा रताच्या संघ निवडीबाबत चर्चा सुरू असताना, आर. अश्विनला खेळविले जाण्याची शक्यता आहे. मला वाटते की हे बरोबर आहे. हे होऊ शकते आणि व्हायला देखील पाहिजे.
भा रताच्या संघ निवडीबाबत चर्चा सुरू असताना, आर. अश्विनला खेळविले जाण्याची शक्यता आहे. मला वाटते की हे बरोबर आहे. हे होऊ शकते आणि व्हायला देखील पाहिजे. कारण तो आॅफ स्पिनर आहे आणि दक्षिण आफ्रिकेकडे डावखुरे फलंदाज जास्त आहेत. क्विंटन डी कॉक, मिलर, जे.पी. ड्युमिनी हे तिन्ही खेळाडू डावखुरे आहेत. ते मोठी खेळी करू शकतात. त्यांच्या विरोधात चांगला फिरकी गोलंदाज फायदेशीर ठरु शकतो. अश्विनची निवड झाली तरी दोन फिरकी गोलंदाज खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे जडेजाला देखील संधी मिळू शकते. तसेच दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हे फिरकी विरोधात फारसे चांगले खेळत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकाविरोधात मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे.
आफ्रिकेकडे आमला, डीकॉक, डुमिनी, फाफ डु प्लेसीस हे दमदार फलंदाजी करतात तर त्यांचे अष्टपैलू खेळाडू देखील चांगली खेळी करतात.
ख्रिस मॉरिस चांगली फलंदाजी करू शकतो. त्याला रोखणे कठीण आहे. त्यासाठी गरजेचे आहे की भारताची फलंदाजी चांगली झाली पाहिजे.
श्रीलंका विरोधात झाले तसे दक्षिण आफ्रिका विरोधात व्हायला नको. भारताने लंकेविरोधात मोठी धावसंख्या उभी केली मात्र लक्ष्याचा बचाव करण्यात भारत अपयशी ठरला. तसे या सामन्यात व्हायला नको.
लक्ष्याचा बचाव करणे गरजेचे आहे.
मला वाटते की संघामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा.
श्रीलंकेविरोधातील पराभव नक्कीच वाईट होता. मात्र त्याचा हा अर्थ असा नाही भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.
स्पर्धेपूर्वीच सर्वांना माहीत होते की,भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतालाच या लढतीत चांगला खेळ करावा लागेल.