आक्रमक भारतीय संघाविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल : प्लेसिस

By admin | Published: September 29, 2015 12:04 AM2015-09-29T00:04:50+5:302015-09-29T00:04:50+5:30

भारतीय संघाकडून गांधी-मंडेला मालिकेमध्ये तुल्यबळ लढतीची अपेक्षा असून यजमान संघाविरुद्ध आम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल

Beware of aggressive Indian team: Plessis | आक्रमक भारतीय संघाविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल : प्लेसिस

आक्रमक भारतीय संघाविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल : प्लेसिस

Next

नवी दिल्ली : भारतीय संघाकडून गांधी-मंडेला मालिकेमध्ये तुल्यबळ लढतीची अपेक्षा असून यजमान संघाविरुद्ध आम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, अशी प्रतिक्रिया भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका टी-२० संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सोमवारी व्यक्त केली. जवळजवळ अडीच महिन्यांच्या कालावधीसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या मोहिमेची सुरुवात मंगळवारी भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सराव सामन्याने होणार आहे. मालिकेचा अधिकृत प्रारंभ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना २ आॅक्टोबरला धर्मशालामध्ये खेळला जाणार आहे.
टी-२० संघाचा कर्णधार प्लेसिस म्हणाला, ‘‘मी या दौऱ्याबाबत उत्सुक आहे, कारण पुढील वर्षी टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात होणार आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने आमच्या संघातील अनेक खेळाडूंना येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची संधी मिळाली आहे. टी-२० मालिकेतील कामगिरी आगामी विश्वकप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
--------
अमला सराव सामन्यात खेळणार नाही
अमलाने मंगळवारी पालम मैदानावर बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सराव सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, अमलाने वैयक्तिक कारणास्तव दोन दिवसांनंतर संघासोबत जुळण्याचा निर्णय घेतला आहे. संघाचे व्यवस्थापक लारेटो मालोकुटू यांनी सांगितले की,‘हाशिम मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यासाठी उपलब्ध नाही. ‘एल्बीला अद्याप भारताचा व्हिसा मिळालेला नाही. त्याला अखेरच्या क्षणी डेव्हिड विजच्या स्थानी संघात स्थान देण्यात आले होते.’

Web Title: Beware of aggressive Indian team: Plessis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.