श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडने जिंकला चंद्रपूर महापौर कुस्ती चषक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 03:01 PM2019-02-11T15:01:24+5:302019-02-11T15:01:58+5:30
धनश्री फंड हिने आपल्या गटातील सर्व कुस्ती एकही गुण न देता १० विरूध्द 0 गुणांच्या फरकाने जिंकल्या.
श्रीगोंदा (अहमदनगर) : चंद्रपूर येथे रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या महापौर कुस्ती चषक स्पर्धा श्रीगोंद्याच्या फंड भगिनींनी गाजविली. भाग्यश्री फंडने महापौर चषक जिंकत गटात सुवर्णपदक पटकावले.
अंतिम लढतीत भाग्यश्री ने कोल्हापूरच्या अंकीता शिंदे हिच्यावर 10 विरूद्ध 0गुणांनी मात महापौर चषक जिंकला भाग्यश्रीचा महापौर अंजली घाटेकर व महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांचे हस्ते 51हजार रोख व दोन किलो वजनाची चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला आणि धनश्री फंड ने गटात सुवर्ण पदक जिंकले या मैदानात फंड भगीनींच्या नावाचा एकच जल्लोष झाला.
या स्पर्धेत भाग्यश्रीने पहिल्या फेरीत चंद्रपुरच्या नेहा बोरूडे १० विरूध्द 0 गुणांनी पराजीत केले. दुसर्या फेरीत कोल्हापुरची आंतरराष्ट्रीय पैलवान स्वाती शिंदे हिचा 10 विरूद्ध 0 गुणांनी पराभव करून महापौर चषक जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली. तिसऱ्या फेरीत कोल्हापूरची राष्ट्रीय पदक विजेती प्रतिक्षा देबाजे हीचा पराभव केला. आणि अंतिम लढतीत कोल्हापुराची राष्ट्रीय मल्ल अंकिता शिंदे ला पराभुत करून चंद्रपूर महापौर चषक जिंकला. धनश्री फंड हिने आपल्या गटातील सर्व कुस्ती एकही गुण न देता १० विरूध्द 0 गुणांच्या फरकाने जिंकल्या.
सेल्फीसाठी झुंबड
भाग्यश्री व धनश्री चांदीची गदा घेऊन चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर आल्या रेल्वेत बसण्यापूर्वी फंड भगीनींबरोबर सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना दुर केले आणि फंड भगीनींना रेल्वेत बसुन दिले यावेळी फंड भगीनींच्या वडीलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारळले.