भज्जी परतला, बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खेळणार
By admin | Published: May 20, 2015 01:50 PM2015-05-20T13:50:53+5:302015-05-20T14:59:53+5:30
आयपीएलमधील चमकदार कामगिरी हरभजन सिंगला पावली असून तब्बल दोन वर्षांनी हरभजन सिंगने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - आयपीएलमधील चमकदार कामगिरी हरभजन सिंगला पावली असून तब्बल दोन वर्षांनी हरभजन सिंगने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. बांग्लादेशविरुद्धच्या एका कसोटीसाठी हरभजन सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ पुढील महिन्यात बांग्लादेश दौ-यावर जाणार असून १० ते १४ जून रोजी भारत व बांग्लादेश यांच्यात एक कसोटी सामना रंगणार आहे. तर १८ जूनपासून तीन एकदिवस सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया दौरा, वर्ल्डकप, त्यापाठोपाठ आयपीएल अशा व्यस्त कार्यक्रमानंतर बांग्लादेश दौ-यात वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेतील अशी चिन्हे होती. मात्र एकाही खेळाडूने विश्रांतीची मागणी केली नव्हती. बुधवारी मुंबईत बीसीसीआयच्या राष्ट्रीय संघनिवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बांग्लादेश दौ-यातील कसोटी व एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. रविंद्र जडेजाला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला आे.
कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, आर.अश्विन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा आणि वरूण अॅरॉन.
वनडे संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबती रायुडू, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि धवल कुलकर्णी