भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी, झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:01 AM2017-08-26T01:01:59+5:302017-08-26T01:02:06+5:30

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेदरम्यान जखमी होताच अखेरच्या दोन फे-यांमध्ये त्याला सहभागी होता आले नाही.

Bhalafekar Neeraj Chopra wounded, Zurich Diamond League Athletics out of competition | भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी, झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेबाहेर

भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी, झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेबाहेर

Next

झुरिच : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेदरम्यान जखमी होताच अखेरच्या दोन फेºयांमध्ये त्याला सहभागी होता आले नाही.
ज्युनियर विश्वविक्रमवीर असलेल्या १९ वर्षांच्या नीरजच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात सहभागी होऊ शकला नाही. पहिल्या प्रयत्नात त्याने ८३.८० मीटर भालाफेक केली. तो सातव्या स्थानी राहिला. दुसºया प्रयत्नात नीरजने फाऊल केला. तिसºया प्रयत्नात तो ८३.३९ मीटर इतकीच भालाफेक करू शकला. झुरिच येथून वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला,‘तिसºया प्रयत्नात भालाफेक करतेवेळी मांसपेशी ताणल्या गेल्या. चौथा प्रयत्न करून व पाहिला पण मांडीत दुखणे उमळल्याने मध्येच थांबलो. ’ भालाफेकीत प्रत्येक खेळाडूला सहा संधी दिल्या जातात.
जखम किरकोळ आहे की गंभीर असे विचारताच नीरज पुढे म्हणाला,‘ही जखम किरकोळ नाही. किरकोळ असती तर अखेरच्या दोन प्रयत्नात मी माघारलो नसतो.’ नीरजला परतीचे विमान गाठायचे असल्याने त्याने स्पर्धास्थळी कुठलीही वैद्यकीय चाचणी केली नाही. या घटनेची भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या एकाही अधिकाºयाला माहिती नव्हती. विश्व चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता झेक प्रजासत्ताकाचा जेकब वेडलेच याने ८८.५० मीटर भालाफेकीसह सुवर्ण जिंकले. जर्मनीचा सध्याचा आॅलिम्पिक विजेता थॉमस रोहलर ८६.५९ मीटरसह दुसºया आणि फिनलॅन्डचा टेरो निपटकामाकी ८६.५७ मीटरसह तिसºया स्थानावर राहिला. जर्मनीचा विश्व चॅम्पियन योहानेस वेटेर याला ८६.१५ मीटरसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)

Web Title: Bhalafekar Neeraj Chopra wounded, Zurich Diamond League Athletics out of competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.